OPPO ने कमी किंमतीत आणला 5G Phone Reno 7 SE; फोनमध्ये 8GB RAM आणि 48MP कॅमेरा
By सिद्धेश जाधव | Published: November 26, 2021 11:46 AM2021-11-26T11:46:39+5:302021-11-26T11:49:42+5:30
Oppo Reno 7SE 5G Phone Price: Oppo Reno 7SE 5G Phone चे दोन व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. हा रेनो 7 सीरिजमधील सर्वात स्वस्त मॉडेल आहे.
OPPO Reno 7 Series ची वाट कंपनीचे चाहते गेले कित्येक दिवस बघत होते आणि अखेरीस आता ही सीरिज सादर करण्यात आली आहे. कंपनीनं या सीरिज अंतर्गत तीन फोन सादर केले आहेत. हे तिन्ही फोन 5G Phone आहेत. परंतु यातील Oppo Reno7 SE 5G हा मॉडेल सर्वात छोटा आणि स्वस्त स्मार्टफोन मॉडेल आहे. चला जाणून घेऊया ओप्पो रेनो7 एसईचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
OPPO Reno 7 SE 5G Price
ओप्पो रेनो 7एसईचे दोन स्टोरेज व्हेरिएंट चीनमध्ये आले आहेत. 8GB/128GB मॉडेलसाठी 2199 युआन (सुमारे 25,500 ₹) द्यावे लागतील. तर 8GB/256GB मॉडेलसाठी 2399 युआन (सुमारे 28,000 ₹) मोजावे लागतील.
Oppo Reno 7 Se 5g Specifications
हा फोन आकाराने देखील छोटा आहे, यात 6.43 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह बाजारात आला आहे. तसेच यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा मिळते. हा फोन मॉर्निग गोल्ड, स्टारी नाईट ब्लॅक आणि स्टार रेन विश या तीन रंगात विकत घेता येईल.
ओप्पो रेनो7 एसई मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स581 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करतो. तर सोबत 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलच्या सोनी आयएमएक्स471 सेन्सरने फ्रंट कॅमेऱ्याची जागा घेतली आहे.
OPPO Reno 7 SE 5G Phone अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12 वर चालतो. फोनला मीडियाटेकचा डिमेनसिटी 900 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी68 जीपीयूला सपोर्ट करतो. हा ओप्पो फोन 8GB RAM आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजसह विकत घेता येईल. या फोनमधील 4,500एमएएचची बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.