DSLR सारख्या कॅमेरा सिस्टमसह Oppo Reno 7 सीरिज करणार एंट्री; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस

By सिद्धेश जाधव | Published: January 24, 2022 02:56 PM2022-01-24T14:56:43+5:302022-01-24T14:58:37+5:30

OPPO Reno 7 series India Launch: ओप्पो रेनो 7 सीरीज येत्या 4 फेब्रुवारीला देशात लाँच केली जाईल, असं कंपनी अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून सांगितलं आहे.

OPPO Reno 7 Series India Launch on 4 February know specs price sale offer  | DSLR सारख्या कॅमेरा सिस्टमसह Oppo Reno 7 सीरिज करणार एंट्री; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस

DSLR सारख्या कॅमेरा सिस्टमसह Oppo Reno 7 सीरिज करणार एंट्री; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस

Next

OPPO इंडियानं काही दिवसांपूर्वी Reno 7 Series च्या भारतीय लाँचची माहिती टीज केली होती. आता कंपनीनं या सीरिजची लाँच डेट सांगितली आहे. ओप्पो रेनो 7 सीरीज पुढील आठवड्यात भारतीयांच्या भेटीला येईल. या सीरिजमध्ये पोर्ट्रेट एक्सपर्ट कॅमेरा सिस्टम असेल, असं देखील कंपनीनं सांगितलं आहे. चीनमध्ये या सीरीज अंतगर्त Oppo Reno 7 5G, Oppo Reno 7 Pro 5G आणि Oppo Reno 7 SE 5G लाँच झाले होते.  

OPPO Reno 7 series India Launch 

ओप्पो रेनो 7 सीरीज येत्या 4 फेब्रुवारीला देशात लाँच केली जाईल, असं कंपनी अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून सांगितलं आहे. हा लाँच इव्हेंट ओप्पोच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवरून थेट प्रक्षेपित केला जाईल. लाँचनंतर काही दिवसांनी OPPO Reno 7 series देशात फ्लिपकार्ट, कंपनीची वेबसाईट व ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.  

OPPO Reno 7 5G चे स्पेसिफिकेशन्स   

Reno 7 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स709 सेल्फी सेन्सरसह लाँच झाला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. OPPO Reno 7 5G अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12 वर चालतो. या मोबाईलला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. सोबत एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. 

OPPO Reno 7 5G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अ‍ॅमोलेड पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा मिळते. फोनचे मॉर्निग गोल्ड, स्टारी नाईट ब्लॅक आणि स्टार रेन विश हे तीन कलर व्हेरिएंट आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी हा ओप्पो फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगच्या मदतीने काही मिनिटांत चार्ज करता येईल.    

हे देखील वाचा:

Web Title: OPPO Reno 7 Series India Launch on 4 February know specs price sale offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.