इतकी असेल दमदार OPPO Reno7 Series ची भारतीय किंमत; पुढील आठवड्यात करणार एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: January 29, 2022 07:53 PM2022-01-29T19:53:40+5:302022-01-29T19:54:06+5:30
Oppo Reno 7 Series India Price: Oppo Reno 7 आणि Oppo Reno 7 Pro फक्त एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटसह भारतात येतील.
Oppo भारतात रेनो 7 सीरीज लाँच करणार आहे. कंपनीनं या सीरिजच्या 4 फेब्रुवारीच्या लाँच इव्हेंटची घोषणा केली आहे. या सीरिजमध्ये ओप्पो रेनो 7 आणि ओप्पो रेनो 7 प्रो स्मार्टफोन सादर केले जातील. आता अधिकृत लाँच पूर्वीच या स्मार्टफोन्सच्या भारतीय किंमतीची माहिती लीक झाली आहे. त्यामुळे तुम्हाला आधीच कल्पना येईल कि हे फोन्स तुमच्या बजेटमध्ये बसत आहेत कि नाही.
Oppo Reno 7 Series India Price
टिपस्टर सुधांशु अंभोरेनं दिलेल्या माहितीनुसार OPPO Reno 7 स्मार्टफोन फक्त 8GB रॅम आणि 256GB मेमोरी असलेला एकच व्हेरिएंट बाजारात येईल. ज्याची किंमत 29,990 रुपये असू शकते. तर OPPO Reno 7 Pro च्या एकमेव 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,990 रुपये असेल. ही फक्त लीक किंमत आहे, यावरून फक्त अंदाज लावला जाऊ शकतो. अधिकृत किंमतीची आपल्याला 4 फेब्रुवारीची वाट बघावी लागेल.
OPPO Reno 7 5G चे स्पेसिफिकेशन्स
Reno 7 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स709 सेल्फी सेन्सरसह लाँच झाला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. OPPO Reno 7 5G अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12 वर चालतो. या मोबाईलला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. सोबत एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.
OPPO Reno 7 5G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अॅमोलेड पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा मिळते. फोनचे मॉर्निग गोल्ड, स्टारी नाईट ब्लॅक आणि स्टार रेन विश हे तीन कलर व्हेरिएंट आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी हा ओप्पो फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगच्या मदतीने काही मिनिटांत चार्ज करता येईल.
हे देखील वाचा:
TWS Earbuds: अॅप्पलच्या चिपसह Beats चे दमदार इयरबड्स लाँच; एकदा चार्ज करा आणि 24 तास वापरा
Amazon Sale: गेमिंग लॅपटॉप झाले स्वस्त; दमदार परफॉर्मन्सवर मिळतेय मोठी सवलत