मोठी माहिती उघड! Oppo नं कॉपी केली OnePlus 10 Pro ची डिजाईन?
By सिद्धेश जाधव | Published: April 6, 2022 08:04 PM2022-04-06T20:04:51+5:302022-04-06T20:05:08+5:30
Oppo Reno 8 च्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. हा फोन वनप्लसच्या सर्वात शक्तिशाली OnePlus 10 Pro सारखा वाटत आहे.
Oppo च्या रेनो सीरिजमध्ये कंपनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करत असते. सध्या कंपनी आपल्या Oppo 8 सीरिजवर काम करत आहे. ही देखील ओप्पोची प्रीमियम स्मार्टफोन सीरिज असेल. कंपनीनं याबाबत कोणतीही माहिती दिली नाही परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार चीनमध्ये या सीरिजमधील फोन्स या महिन्यात सादर केले जाऊ शकतात. आता प्रसिद्ध टिपस्टर DigitalChatStation नं Oppo Reno 8 स्मार्टफोनचा फर्स्ट लुक शेयर केला आहे, जो हुबेहूब OnePlus 10 Pro सारखा दिसत आहे.
Oppo Reno 8 ची डिजाईन
तुम्हाला तर माहित आहे की, वनप्लस ओप्पोचा सब-ब्रँड आहे. चीनमध्ये ओप्पोच्या कलर ओएससह वनप्लसचे स्मार्टफोन सादर केले जातात. तसेच याआधी देखील अनेक वनप्लस आणि ओप्पो फोन्स एकाच डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. परंतु त्या फोन्समध्ये थोडं अंतर ठेवण्यात येतं असे आणि आता समोर आलेल्या लिक्सनुसार दोन्ही फोन्समध्ये कोणताही फरक दिसत नाही.
लीक इमेजमध्ये Oppo Reno 8 पंच-होल कटआउटसह दाखवण्यात आला आहे. तर मागे असलेला कॅमेरा मॉड्यूल, लेन्सची जागा आणि गोलाकार LED फ्लॅश अगदी OnePlus 10 Pro सारखा आहे. वनप्लसच्या फोनप्रमाणे टेक्सचर बॅक पॅनल देखील इथे दिसत आहे. फक्त हॅसलब्लॅडचं ब्रँडिंग दिसत नाही.
Oppo Reno 8 चे स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno 8 मध्ये FHD+ रिजोल्यूशन असलेला 6.55 इंचाचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 50MP चा Sony IMX766 सेन्सर मेन कॅमेरा म्हणून मिळू शकतो. जुन्या सीरिज प्रमाणे Reno 8 मध्ये देखील AI पावर्ड कॅमेरा मिळू शकतो. तसेच कंपनीनं Reno 8, Reno 8 Pro आणि Reno 8 Pro Plus असे तीन मॉडेल सादर करू शकते.