वनप्लस सारखा दिसणारा Oppo चा स्मार्टफोन; Oppo Reno 8 SE चे स्पेसिफिकेशन ऑनलाइन लीक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 07:32 PM2022-05-14T19:32:14+5:302022-05-14T19:32:26+5:30
Oppo Reno 8 SE चे स्पेसिफिकेशन ऑनलाइन लीक झाले आहेत, हा पोरं 50MP कॅमेरा, Dimensity 1300 SoC सह लवकरच लाँच होऊ शकतो.
Oppo आपल्या रेनो सीरिजमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करत असते. आगामी रेनो सीरिज वनप्लस 10 प्रोच्या डिजाईनसह सादर केली जाईल, अशी माहिती रेंडर्समधून मिळाली आहे. आता Oppo Reno 8 SE चे स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक झाले आहेत. यातून फोनच्या डिस्प्ले, प्रोसेसर आणि बॅटरीची माहिती मिळाली आहे. Oppo Reno 8 सीरीज जूनच्या अखेरपर्यंत भारतात लाँच होऊ शकते.
Oppo Reno 8 SE चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
91Mobiles नं टिपस्टर योगेश ब्रारच्या हवाल्याने आगामी रेनॉ सीरिजच्या फोनची माहिती दिली आहे. Oppo Reno 8 SE 6.43 इंचाचा फुल एचडीप्लस डिस्प्ले मिळेल. हा फोन अँड्रॉइड 12 ओएससह येईल, ज्यात MediaTek Dimensity 1300 SoC ची प्रोसेसिंग पावर मिळेल. कंपनी 6GB/128GB व 8GB/256GB असे दोन स्टोरेज ऑप्शन्स सादर करू शकते.
फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी मिळू शकते. Oppo Reno 8 SE कधी लाँच होईल याची माहिती मिळाली नाही.