लाँचपूर्वीच जाणून घ्या OPPO Reno 6 Pro ची किंमत; ओप्पो फोनचा रिटेल बॉक्स लीक
By सिद्धेश जाधव | Published: July 12, 2021 01:08 PM2021-07-12T13:08:54+5:302021-07-12T13:09:47+5:30
Oppo Reno6 Pro Price: टिप्सटरने Oppo Reno 6 Pro च्या किंमतीची माहिती दिली आहे. दोन टिप्सटरनी एकच किंमत लीक केली आहे.
Oppo ची फ्लॅगशिप Oppo Reno 6 सीरिज लवकरच भारतीयांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज Flipkart च्या माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro भारतात 14 जुलैला लाँच होणार आहेत. हे फ्लॅगशिप स्मार्टफोन दुपारी 3 वाजता ऑनलाइन इव्हेंटमधून सादर केले जातील. लाँच होण्यापूर्वी या सीरीजची बरीचशी माहिती उघड झाली आहे. आता OPPO Reno 6 Pro ची किंमत लीक झाली आहे.
OPPO Reno 6 Pro ची लीक किंमत
टिप्सटर देब्यान रॉयने Oppo Reno 6 Pro च्या किंमतीची माहिती दिली आहे. Oppo Reno6 Pro च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात 46,990 रुपये असू शकते, असे टिप्सटर सांगितले आहे. या व्हेरिएंटची इंट्रोडक्टरी किंमत फक्त 42,990 रुपये असू शकते, असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच या स्मार्टफोनचा छोटा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 38,990 रुपये किंवा 39,990 रुपयांमध्ये विकला जाऊ शकतो.
🚨 Exclusive 🚨
— Gadgetsdata(Debayan Roy) (@Gadgetsdata) July 10, 2021
Oppo Reno 6 Pro Price :
12+256GB - MRP - Rs 46,990
We can Expect launch price for 12+256GB - Rs 42,990 or 43,990
There will be a🛑8+128GB variant as well.. Expected price - Rs 38,990 or 39,990
🔃 ReTweet will be Amazing ❤️😍 pic.twitter.com/8uYzRbByoC
त्याचबरोबर टिपस्टर रॉक लीकने देखील ओप्पोच्या या स्मार्टफोनची किंमत शेयर केली आहे. त्याने रिटेल बॉक्सचा एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे, या स्क्रीनशॉटवरून ओप्पोच्या या फोनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. या फोटोमध्ये ओप्पोच्या या फोनची किंमत 46,990 रुपये आहे. दोन्ही टिप्सटरच्या किंमती सारख्याच असल्यामुळे हा फोन याच किंमतीत लाँच होण्याची शक्यता वाढली आहे.
Oppo Reno 6 Pro 5G चे स्पेसीफाकेशन्स
Oppo Reno 6 Pro 5G मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल. या ओप्पो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 1200 प्रोसेसर आणि 12GB रॅम दिला जाऊ शकतो. रेनो 6 प्रो 5G मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh ची बॅटरी मिळेल.
Reno 6 चे स्पेसीफाकेशन्स
Reno 6 मध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक Dimensity 900 SoC सह 12GB पर्यंतचा रॅम मिळेल. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. Reno 6 मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच 4,300mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल.