सुपरफास्ट! फक्त 9 मिनिटांत फुलचार्ज होणार स्मार्टफोन; सॅमसंग-शाओमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं केली कमाल
By सिद्धेश जाधव | Published: March 1, 2022 03:26 PM2022-03-01T15:26:57+5:302022-03-01T15:27:56+5:30
Oppo नं MWC 2022 मध्ये 240W SuperVooc फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात वेगवान मोबाईल चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.
Oppo नं सध्या सुरु असलेल्या Mobile World Congress (MWC 2022) मधून वेगवान मोबाईल चार्जिंगच्या स्पीडचा विक्रम मोडीत काढला आहे. कंपनीनं आपली दमदार 240W SuperVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजी जगासमोर ठेवली आहे. 240W पर्यंतच्या फास्ट चार्जिंगच्या मदतीनं फोनमधील 4500mAh ची बॅटरी फक्त 9 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. त्याचबरोबर ओप्पोची 150W SuperVOOC Flash चार्ज टेक्नॉलॉजीही सादर करण्यात आली आहे.
Oppo 240W SuperVOOC टेक्नॉलॉजी
240W SuperVooc फास्ट चार्जिंग टाइप सी इंटरफेसवर 24V/10A टेक्नॉलॉजीसह डिजाइन करण्यात आली आहे. यातील 3 चार्ज पंप स्मार्टफोनमध्ये जाणाऱ्या विजेला 10V/24A वर बदलू शकतात. त्यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरी हीट मॅनेजमेंटवर कोणताही परिणाम होत नाही. यातील कस्टमाइज चिप वोल्टेज, करंट आणि तापमानावर नियंत्रण ठेवते. ही टेक्नॉलॉजी स्मार्टफोन्समध्ये व्यावसायिकरित्या कधी येईल, हे अजून समजलं नाही.
150W SuperVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजी
रेकॉर्डब्रेक फास्ट चार्जिंगसह कंपनीनं हेल्थ इंजिनसह 150W SuperVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील सादर केली आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 4500mAh ची बॅटरी फक्त 5 मिनिटांत 50 टक्क्यापर्यंत चार्ज करते. तर बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी फक्त 15 मिनिटे लागतात. लवकरच ही टेक्नॉलॉजी आगामी OnePlus स्मार्टफोनमध्ये दिसू शकते.
हे देखील वाचा:
- ‘या’ स्मार्टफोनची किंमत पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 108MP कॅमेऱ्यासह किफायतशीर 5G फोन लाँच
- 18GB दमदार RAM सह Lenovo Legion Y90 गेमिंग फोन लाँच; इतकी आहे मोठया बॅटरीसह येणाऱ्या मोबाईलची किंमत
- 15 हजारांच्या आत फाडू फोन; 11GB RAM, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगसह POCO M4 Pro ची भारतात एंट्री