तुम्हालाही मोबाईलवर OTP येत नाहीये? पाहा त्यामागे काय आहे नक्की कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 17:44 IST2021-03-09T17:42:04+5:302021-03-09T17:44:43+5:30
Mobile OTP : सध्या अनेकांना ओटीपी न येण्यासारख्या समस्या भेडसावत आहेत

तुम्हालाही मोबाईलवर OTP येत नाहीये? पाहा त्यामागे काय आहे नक्की कारण
सध्या OTP द्वारे कोणतंही काम करण्याच्या किंवा ते व्हेरिफाय करण्याच्या पद्धतीत वाढ झाली आहे. अनेकदा ओटीपी मिळाला नाही तरी आपली कामं रखडून जातात किंवा ती होतच नाहीत. अनेक लोकांना सध्या ओटीपी न येण्याची समस्या जाणवत आहे. बँक ट्रान्झॅक्शन, ई-कॉमर्स वेबसाईट यांचा वन टाईप पासवर्ड म्हणजेच ओटीपी ग्राहकांना मिळण्यात समस्या निर्माण होत आहेत.
सध्या CoWIN चा किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करतानाही अनेकांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यांना ओटीपीच मिळत नसल्यामुळे त्यांना लोकांना लॉग इन करण्यास समस्या येत आहेत. परंतु अद्यापही टेलिकॉम ऑपरेटर्सनं याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. रिपोर्ट्सनुसार ही समस्या नव्या SMS रेग्युलेशनमुळे निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. नव्या SMS रेग्युलेशन SMS फ्रॉड थांबवण्यासाठी दूरसंचार नियमाक मंडळाकडून सुरू करण्यात आलं आहे. परंतु या प्रोसेसमुळे अनेक ससम्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यामध्ये ओटीपी न येणं ही एक मोठी समस्या आहे.
रिपोर्ट्सनुसार ट्रायनं यासंदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना DLT नोंदणी करणं आवश्यक आहे. यामागील उद्देश ओटीपी फ्रॉड आणि एसएमएस थांबवणं हे आहे. हे लागू करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी ही प्रोसेस सुरू केली आहे. परंतु यामुळे पुश नोटिफिकेशन पूर्णपणे बाधित झालं आहे. लोकांना आता त्यांच्या मोबाईलवर ओटीपी मिळवण्यातही समस्या येत आहेत.
DLT नोंदणीनंतर काय होणार?
DLT सिस्टमध्ये रजिस्टर्ड टेम्पलेटवाल्या प्रत्येक SMS कंटेन्टला व्हेरिफाय केल्यानंतरच डिलिव्हर केलं जाणार आहे. या प्रोसेसला स्क्रबिंगही म्हटलं जातं. ८ मार्चपासून ही प्रोसेस लागू करण्यात आली आहे. यामुळेच अनेकांना ओटीपी मिळण्यात समस्या येत आहेत. टेलिकॉम कंपन्यांनी बँक आणि कंपन्यांच्या आपले टेम्पलेट रजिस्टर करण्यास पहिलेच सांगितलं होतं. त्यांना यासाठी ७ मार्चपर्यंतची वेळही देण्यात आली होती. ज्या कंपन्यांनी आपले टेम्पलेट सजिस्टर केले नाही त्यांना ओटीपी मिळण्यास समस्या निर्माण होत आहे. जेव्हा ते रजिस्टर करतील तेव्हा ओटीपी मिळण्यास पुन्हा सुरूवात होईल. ही समस्या केव्हा दूर होईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.