मोबाइलवर ओटीटी इंटरनेटशिवाय; ‘डीटूएम’साठी केंद्र सरकार व आयआयटी कानपूरचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 06:32 AM2023-08-07T06:32:34+5:302023-08-07T06:32:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : टीव्हीवरील सर्व चॅनेल्स आता थेट मोबाइलवर, तेही इंटरनेटविना पाहता येणार आहे. ‘डीटूएच’च्या धर्तीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : टीव्हीवरील सर्व चॅनेल्स आता थेट मोबाइलवर, तेही इंटरनेटविना पाहता येणार आहे. ‘डीटूएच’च्या धर्तीवर ‘डीटूएम’ प्रणालीसाठी केंद्रीय दूरसंचार विभाग, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि आयआयटी कानपूर एकत्रित काम करत आहे. त्यामुळे अगदी कमी खर्चात टीव्ही चॅनेल्सचा अनुभव मोबाइलवर घेता येणार आहे.
काय आहे डीटूएम?
डायरेक्ट टू मोबाइल (डीटूएम) हे - ब्रॉडबॅण्ड आणि ब्रॉडकास्टचे एकत्रित रूप असून, रेडिओ लहरीच्या रूपात ही प्रणाली काम करणार आहे.
मोफत की सशुल्क?
मोबाइलवर विविध टीव्ही चॅनेल्ससह रेडिओ, शैक्षणिक मजकूर, आपत्कालीन सूचना प्रसारित केल्या जाईल. हे सर्व प्रसारण मोबाइलवर अगदी कमी खर्चात होणार असल्याने मोबाइल ऑपरेटर कंपन्यांच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो.
nमोबाइलवर रेडिओ चालतो, त्याप्रमाणे अधिक मेगाहर्ट्सच्या फ्रिक्वेन्सीवरून टीव्हीचे प्रसारण होईल.
nया सुविधेसाठी ५२६-५८२ मेगाहर्ट्सच्या फ्रिक्वेन्सीची चाचपणी सुरू आहे.