15,600mAh क्षमता असलेल्या अवाढव्य बॅटरीसह ‘हा’ 5G स्मार्टफोन लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळणार 6 दिवसांचा बॅकअप
By सिद्धेश जाधव | Published: August 23, 2021 05:09 PM2021-08-23T17:09:04+5:302021-08-23T17:09:58+5:30
Big Battery Smartphone: Oukitel WP15 स्मार्टफोन 299.99 डॉलरमध्ये अलीएक्सप्रेसवर लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत जवळपास 22,200 रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा
Oukitel ने आज 15600mAh बॅटरीसह Oukitel WP15 5G रगेड स्मार्टफोन लाँच केला आहे. हा जगातील पहिला 5G रगेड स्मार्टफोन आहे, असा Oukitel ने दावा केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चिपसेट, 8GB रॅम आणि 48 मेगापिक्सलचा सोनी सेन्सर असे दमदार स्पेक्स देखील देण्यात आले आहेत. रिवर्स चार्जिंग फिचरमुळे या फोनचा वापर पावरप्रमाणे देखील करता येतो.
Oukitel WP15 ची किंमत
Oukitel WP15 स्मार्टफोन 299.99 डॉलरमध्ये अलीएक्सप्रेसवर लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत जवळपास 22,200 रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन भारतात थेट खरेदीसाठी उपलब्ध झालेला नाही, परंतु अली एक्सप्रेसवरून हा फोन विकत घेता येऊ शकतो. हे देखील वाचा: 12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Vivo Y33s भारतात लाँच; जाणून घ्या शानदार स्मार्टफोनची किंमत
Oukitel WP15 की स्पेसिफिकेशन
Oukitel WP15 5G रगेड स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरवर चालतो. तसेच या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते.
Oukitel WP15 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य Sony सेन्सर आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 0.3 मेगापिक्सलचा वर्च्युल लेन्स देण्यात आली आहे.हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनची खासियत 15,600 एमएएचची दमदार बॅटरी आहे, जी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. हे देखील वाचा: Alert! हे 8 अॅप्स चुकूनही करू नका डाउनलोड; आणखीन 120 अॅप्स अजूनही अँड्रॉइडवर उपलब्ध
हा फोन 5 तासांत फुल चार्ज होतो, असे कंपनीने सांगितले आहे. तसेच ही बॅटरी 1300 तासांचा स्टॅन्डबाय टाइम आणि 90 तासांचा कॉलिंग टाइम देते. हा रगेड फोन असल्यामुळे हा फोन वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह येतो आणि उंचावरून पडल्यावर देखील हा सुरक्षित राहतो. एवढ्या मोठ्या बॅटरीसह येणारा हा पहिलाच रगेड स्मार्टफोन असेल.