90 दिवस चार्जींगविना वापरता येणार दणकट Smartphone; कधीच येणार नाही स्क्रॅच किंवा क्रॅक
By सिद्धेश जाधव | Updated: June 24, 2022 15:12 IST2022-06-24T15:12:17+5:302022-06-24T15:12:28+5:30
Oukitel WP19 स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. सुरुवातीचे काही दिवस यावर 50% डिस्काउंट दिला जाईल.

90 दिवस चार्जींगविना वापरता येणार दणकट Smartphone; कधीच येणार नाही स्क्रॅच किंवा क्रॅक
Oukitel कंपनी खूप छोटी आहे परंतु अनेक दणकट स्मार्टफोन कंपनीनं आतापर्यंत लाँच केले आहेत. कंपनीच्या रगड स्मार्टफोन्सना जगभरातून प्रतिसाद मिळतो. आता एक नवीन हँडसेट Oukitel WP19 कंपनीनं सादर केला आहे. या फोनमध्ये 21,000mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे. तसेच अन्य शानदार फीचर्स देखील फोनमध्ये मिळतात.
Oukitel WP19 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
यातील 21000mAh ची मोठी बॅटरी सिंगल चार्जवर 7 दिवस सहज वापरता येईल. कंपनीनं दावा केला आहे की 90 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो. फोन 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी सॅमसंग 64MP चा मुख्य कॅमेरा आणि Sony 20MP चा नाईट व्हिजन सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनयामध्ये इंफ्रारेड सेन्सर देखील देण्यात आला आहे.
Oukitel WP19 मध्ये 6.78-इंचाचा FHD + डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2460 x 1080p रिजॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 ओएसवर चालतो. यातील IP68, IP69, आणि MIL-STD-810H सर्टिफिकेशन फोनला वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ आणि शॉकप्रूफ बनवतात.
Oukitel WP19 ची किंमत आणि उपलब्धता
Oukitel WP19 स्मार्टफोनची किंमत 600 डॉलर (46,963 रुपये) ठेवण्यात आली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हा फोन 50 टक्के डिस्काउंटनंतर आता फक्त 269.99 डॉलर (21,132 रुपये) मध्ये विकला जात आहे. तुम्ही याची खरेदी AliExpress च्या माध्यमातून करू शकता.