Smart Ring : अंगठीची कमाल, ताप-हार्टबिट्स सर्वकाही सांगणार; झोपही ट्रॅक करणार, किंमत पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:28 PM2022-05-30T12:28:09+5:302022-05-30T12:28:34+5:30
दिग्गज ब्रँडनं तयार केलेल्या या अंगठीत कमालीचे स्मार्टवॉचवाले फीचर्स देण्यात आले आहेत.
सध्या अनेक स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट आणि झोप ट्रॅक करण्यासारखे फीचर्स आले आहेत. परंतु हेच सर्व फीचर्स एका अंगठीत मिळतायत असं सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का? लक्झरी फॅशन ब्रँड Gucci आणि फिनलँडची हेल्छ टेक्नॉलॉजी कंपनी Oura नं एक अल्ट्रा प्रीमिअम स्मार्ट रिंग तयार केली आहे. यामध्ये एक स्मार्ट वॉचवाले फीचर्स देण्यात आले आहेत. याची किंमत तब्बल ९५० डॉलर्स म्हणजेच जवळपास ७४ हजार रूपये आहे.
ही अंगठी स्लीक असून ती उत्तमरित्या डिझाईन करण्यात आली आहे. बी पीव्हीडी कोटेड टायटॅनिअमनं बनली आहे.तसंच यावर Gucci चं सिग्नेचर मोनोग्रामही बनला आहे. याशिवाय अंगठीच्या कडा १८ कॅरेट गोल्डनं डिझाइन करण्यात आल्या. रिंग १०० मीटर पर्यंत वॉटर रेझिस्टंट आणि ७.६ मिमी जाड आहे. याच्या आतील बाजूला सेन्सर्सही लावण्यात आलेत.
अनेक हेल्थ फीचर्स
यामध्ये एका स्मार्टवॉचमध्ये येणारे सर्वच हेल्थ फीचर्स देण्यात आलेत. यात हार्ट रेट मॉनिटर, टेंपरेचर सेन्सर, SpO2 सेन्सिंग अँड स्लीप अॅनालिसिससारख्या सुविधा देण्यात आल्या.
सात दिवसांची बॅटरी
या रिंगमध्ये चार ते सात दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. तसंच ती ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन आणि अन्य डिव्हाइसेससोबत कनेक्ट केली जाऊ शाकते. यामध्ये टाईप सी पोर्टसह Gucci ब्रँडचा चार्जरही मिळतो. या रिंगसाठी सॉफ्टवेअर अपडेट्सही देण्यात येणार आहेत.