Outlook Down : मायक्रोसॉफ्टच्या ईमेल सर्व्हिसमध्ये तांत्रिक अडचण, युजर्सकडून तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:32 PM2020-10-01T15:32:57+5:302020-10-01T15:35:02+5:30
Outlook Email Service Down : आउटलुकची ही तांत्रिक अडचण आजच नाही तर गेल्या एक-दोन दिवसांपासून मायक्रोसॉफ्टच्या या ईमेल सर्व्हिसमध्ये निर्माण होत आहेत.
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीची ई-मेल सेवा आउटलुक ऑफिस (Outlook Office) गुरुवारी डाऊन झाली आहे. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector ने याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, आउटलुकची ही तांत्रिक अडचण आजच नाही तर गेल्या एक-दोन दिवसांपासून मायक्रोसॉफ्टच्या या ईमेल सर्व्हिसमध्ये निर्माण होत आहेत. याबाबत युजर्सही तक्रार करत आहेत. तसेच अनेक युजर्संनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरुन तक्रारी केल्या आहेत.
भारतात ही तांत्रिक समस्या सकाळी साडे दहा वाजल्यानंतर सुरू झाली. सध्या ही सर्व्हिस स्लो सुरु आहे. फक्त ईमेल क्लायंटच नाही तर युजर्स डाऊन डिटेक्टरवर Office 365 तांत्रिक अडचणीसंदर्भात रिपोर्ट करत आहेत. दरम्यान, Office 365 ने हळू-हळू काम सुरू केले आहे. मात्र, ही समस्या आउटलुकमध्ये कायम आहे.
अद्याप स्पष्ट हे झाले नाही की, यामुळे किती लोकांना ही समस्या येत आहे आणि कोणत्या ठिकाणी याचा परिणाम होत आहे. अलिकडे मायक्रोसॉफ्टने म्हटले होते की, कंपनी आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये येणाऱ्या अडचणींबाबत कंपनी तपास करत आहेत.
दरम्यान, ऑफिस वर्क इतर कामांसाठी मायक्रोसॉफ्ट आउटलुक ऑफिसचा वापर केला जातो. ही सर्वात लोकप्रिय ई-मेल सेवा आहे. त्यामुळे अशा स्थितीत ही सेवा ठप्प झाल्यामुळे युजर्संना बरीच अडचण सहन करावी लागत आहे. या आधी 29 सप्टेंबरच्या रात्री मायक्रोसॉफ्ट आउटलुक ऑफिस जवळपास 1 तास ठप्प झाले होते.
(Source: Downdetector)