अलर्ट! देशात 600 हून अधिक बेकायदेशीर कर्ज देणारे Apps; वेळीच व्हा सावध नाहीतर बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 03:13 PM2021-12-15T15:13:46+5:302021-12-15T15:18:29+5:30

600 Illegal Apps : युजर्सला 600 बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या Apps बद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे.

over 600 illegal lending apps operating in india says indian government | अलर्ट! देशात 600 हून अधिक बेकायदेशीर कर्ज देणारे Apps; वेळीच व्हा सावध नाहीतर बसेल मोठा फटका

अलर्ट! देशात 600 हून अधिक बेकायदेशीर कर्ज देणारे Apps; वेळीच व्हा सावध नाहीतर बसेल मोठा फटका

Next

नवी दिल्ली - कर्ज देणारे अनेक अ‍ॅप हे सध्या अगदी सहज उपलब्ध आहेत. मात्र यातील अनेक अ‍ॅप हे फेक असून फसवणूक करणारे आहे. देशात सध्या 600 हून अधिक असे अ‍ॅप उपलब्ध असल्याची माहिती आता समोर आली आहे. सरकारने RBI च्या हवाल्याने युजर्सला 600 बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या Apps बद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे. हे App Store वर उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या फेक Apps विरोधात सरकारने केलेल्या सुधारात्मक कारवाईबाबत लोकसभेत एका लिखित उत्तरात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने IT मध्ये सांगितलेल्या प्रोसेसनंतर 27 बेकायदेशीर कर्ज देणारे Apps ब्लॉक केले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारी नोंदवण्यासाठी RBI ने Sachet या पोर्टलला जानेवारी 2020 ते मार्च 2021 पर्यंत डिजीटल कर्ज देणाऱ्या Apps विरोधात 2562 तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींमध्ये Apps द्वारे आकारलं जाणारं अतिरिक्त व्याज आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी त्रास दिल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या.

Sachet पोर्टलवर RBI च्या नियमन केलेल्या संस्थांद्वारे प्रमोट केलेले कर्ज देणारे Apps, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या नोंदणीकृत संस्थांसाठी कंपनीचे रजिस्ट्रार आणि असंघटित संस्था आणि व्यक्तींसाठी तक्रारदारांच्या तक्रारी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवल्या जातात. यामध्ये सर्वाधिक घटना या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाला आणि तामिळनाडूतील लोकांची फसवणूक करण्यात आली आहे.  

RBI ने सर्वसामान्यांना अनधिकृत डिजिटल लोन प्लॅटफॉर्म किंवा मोबाइल Apps च्या कोणत्याही गोष्टीला बळी न पडण्याचा इशारा दिला होता. त्याशिवाय अशा Apps वरुन कर्ज घेताना त्या App किंवा फर्मची हिस्ट्री वेरिफाय करण्याचं आवाहन केलं होतं. तसेच Google Play Store किंवा Apple App Store वर कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे अनेक Apps असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे अशा कोणत्याही फसवणुकीला बळू पडू नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: over 600 illegal lending apps operating in india says indian government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.