फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसाठी मोजावे लागणार पैसे..? कंपनीने सुरू केली तयारी...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 07:08 PM2022-09-01T19:08:59+5:302022-09-01T19:09:13+5:30
मेटाने एक नवीन डिव्हिजन बनवले आहे, ज्यात पेड फीचरवर काम सुरू आहे.
सध्या Metaचे प्रोडक्ट(फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप) मोफत उपलब्ध आहेत. पण, आता कंपनी लवकरच यातील काही खास फीचर्स वापरण्यासाठी पैसे आकारू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, मेटा एक नवीन प्रोडक्ट ऑर्गनायझेशन सेटअप करत आहे, ज्याचे काम Facebook, Instagram आणि WhatsApp वर पेड फीचर्ससाठी काम करणे असेल. या युनिटची प्रमुख प्रतिति राय चौधरी असतील, ज्यांनी यापूर्वी Meta च्या हेड ऑफ रिसर्च पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
इतर सोशल मीडिया कंपन्यांबद्दल बोलायचं झालं, तर Snap आणि Twitter आधीपासूनच काही पेड सर्व्हिसेस ऑफर करतात. यात युजर्सना Twitter Blue आणि Snapchat+ नावाने सर्व्हिस मिळते. या अंतर्गत कंपनी कंटेट क्रिएटर्सना अनेक एक्सक्लूसिव्ह फीचर्स देते.
काय आहे Metaचा प्लान?
The Verge च्या रिपोर्टनुसार, मेटा एक नवीन डिव्हिजन तयार करत आहे, ज्याचे नाव New Monetization Experiences असेल. या डिव्हिजनला फेसबुक, इंस्टाग्राम आणि WhatsApp साठी पेड फीचर्सवर फोकस करण्याचे काम दिले जाईल. या युनिटला प्रतिति राय चौधरी लीड करतील.
रिपोर्टमध्ये ही माहिती इंटरनल मेमोच्या हवाल्या दिली आहे. ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा पेड फीचर्सची चर्चा सुरू आहे. यापूर्वीही अनेकवेळा अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. हे पेट फीचर्स कसे असतील, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपल्या अॅड्स बिझनेसला वाढवण्यसाठी, युजर्सना अॅड्स ऑफ फीचर देण्याच्या तयारीत नाही.