पाकिस्तानी हॅकरने चोरला कोट्यवधी युजर्सचा खासगी डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:57 PM2019-10-03T15:57:47+5:302019-10-03T15:59:34+5:30

वर्ड्स विथ फ्रेंड्स एक मल्टीप्लेअर वर्ल्ड गेम आहे.

Pakistani hacker steals profile data of 218 million Words With Friends players | पाकिस्तानी हॅकरने चोरला कोट्यवधी युजर्सचा खासगी डेटा

पाकिस्तानी हॅकरने चोरला कोट्यवधी युजर्सचा खासगी डेटा

googlenewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या एका हॅकरने 21.8 कोटी युजर्सचा डेटा हॅक केला आहे. हे युजर्स मल्टीप्लेअर गेम Words With Firends गेमचे प्लेअर आहेत. Gnosticplayers नावच्या या पाकिस्‍तानी हॅकरने दावा केला आहे की, त्याने हॅकिंगच्या माध्यमातून गेम खेळणाऱ्या प्लेयर्सचे नाव, ईमेल आयडी, फ लॉगइन आयडी, पासवर्ड आणि फोन नंबर तसेच फेसबुक आयडी सुद्धा अॅक्सेस केला आहे. 

वर्ड्स विथ फ्रेंड्स एक मल्टीप्लेअर वर्ल्ड गेम आहे. हा गेम  Zynga या कंपनीना तयार केला आहे. अॅपल अॅप स्टोअरवर हा गेम जास्त पॉप्युलर आहे. या गेला 4.5 स्टार सेटिंग मिळाला आहे. तर गुगल प्ले स्टोअरवर या गेमला 4.2 स्टार रेटिंग आहे. आयओएस, अॅन्ड्राईड शिवाय हा गेम वेब ब्राउजर आणि विंडोज फोनमध्ये खेळला जातो. हा गेम खेळण्यासाठी जर तुम्ही सप्टेंबरच्या आधी रजिस्टर केले आहे. तर आपले डिटेल्स हॅकरच्या हाती लागले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे असे असेल तर लवकरच या गेमचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड बदला.

एक्सपर्ट्सनी गेम खेळणाऱ्या प्लेअर्सना सल्ला दिला आहे की, त्यांनी वर्ड्स विथ फ्रेंड्स अॅपवरील सर्व अकाउंट्सचे लॉगइन-पासवर्ड बदलावे. असे न केल्यास नको असलेले व्हिजीटर प्लेअर्सच्या वर्ड्स विथ फ्रेंड्सच्या हायस्कोरमध्ये फेरफार करू शकतात. त्यामुळेच सिक्युरिटी एक्सपर्ट्स युजर्सला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्ससाठी विविध लॉगइन डिटेल्स ठेवण्याचा सल्ला देतात.

वर्ड्स विथ फ्रेंड्स गेम हॅक करण्यात आल्यासंबंधी जास्त माहिती कंपनीकडून देण्यात आली नाही. मात्र, गेल्या काही आठवड्यात कंपनीने एक स्टेटमेंट पोस्ट करून डेटा लीक झाल्याची शक्यता वर्तविली होती. त्यावेळी कंपनीने फक्त डेटा लीकसंबंधी असे सांगितले होते की, युजर्सच्या फायनन्स किंवा पेमेंट डेटाला कोणतेही नुकसान झाले नाही. तसेच, याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे सांगितले.

Web Title: Pakistani hacker steals profile data of 218 million Words With Friends players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.