पॅनासोनिक एल्युगा सी : जाणून घ्या सर्व फिचर्स
By शेखर पाटील | Published: December 1, 2017 01:13 PM2017-12-01T13:13:17+5:302017-12-01T13:14:16+5:30
पॅनासोनिक कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप असणारा एल्युगा सी हा स्मार्टफोन बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.
पॅनासोनिक कंपनीने भारतीय बाजारपेठेतील आपला पाया मजबूत करण्यासाठी अलीकडच्या काळात नवनवीन मॉडेल्स सादर करण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने अलीकडेच पॅनासोनिक पी 91 आणि एल्युगा आय 5 हे मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. यातच आता कंपनीने एल्युगा सी या नवीन मॉडेलला लाँच करण्याची घोषणा केली आहे. पहिल्यांदा ते तैवानमध्ये मिळणार असले तरी लवकरच याला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.
पॅनासोनिक एल्युगा सी या स्मार्टफोनमध्ये वर नमूद केल्यनुसार ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याच्या मागील बाजूस एफ/2.2 अपार्चर तसेच एलईडी फ्लॅशसह 13 आणि 5 मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात 8 मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात मीडियाटेकचा ऑक्टा-कोअर एमटी 6750 प्रोसेसर असेल. याची रॅम 4 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात 3 हजार मिलीअॅपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. यात पुढील बाजूस बटनाच्या ठिकाणर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. भारतीय चलनानुसार याचे मूल्य 12 हजार 900 रूपये इतके आहे. ग्राहकांना पिंक आणि ब्ल्यू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे.