पॅनासोनिक पी ९: किफायतशीर स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: September 8, 2017 06:33 PM2017-09-08T18:33:30+5:302017-09-08T18:35:29+5:30

पॅनासोनिक कंपनीने आपला पी ९ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून या किफायतशीर मॉडेलमध्ये अनेक उत्तम फिचर्सचा समावेश आहे.

Panasonic P9 is Lucrative Smartphone | पॅनासोनिक पी ९: किफायतशीर स्मार्टफोन

पॅनासोनिक पी ९: किफायतशीर स्मार्टफोन

Next
ठळक मुद्देपॅनासोनिक पी ९ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहेतसेच यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट प्रदान करण्यात आला आहेपॅनासोनिक पी ९ शँपेन गोल्ड आणि ब्लॅक या रंगांमध्ये ६,४९० रूपयांत उपलब्ध करण्यात आला आहे

पॅनासोनिक कंपनीने आपला पी ९ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून या किफायतशीर मॉडेलमध्ये अनेक उत्तम फिचर्सचा समावेश आहे.

पॅनासोनिक पी ९ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. तसेच यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. पॅनासोनिक पी ९ हे मॉडेल शँपेन गोल्ड आणि ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना ६,४९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन देशभरातील शॉपीजमधून ग्राहकांना खरेदी करता येईल. यात पाच इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले असून यावर असाही ड्रॅगनटेलचे संरक्षक आवरण असेल. क्वाड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ या प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पॅनासोनिक पी ९ या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर यात २२१० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

Web Title: Panasonic P9 is Lucrative Smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.