पॅनासोनिकचा किफायतशीर स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: April 18, 2018 12:55 PM2018-04-18T12:55:17+5:302018-04-18T12:55:17+5:30
पॅनासोनिक कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी पॅनासोनिक पी१०१ हा किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे.
पॅनासोनिक कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी पॅनासोनिक पी१०१ हा किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे. पॅनासोनिकने अलीकडेच पी१०० हा स्मार्टफोन लाँच केला होता. आता याच मालिकेत पी१०१ हे मॉडेल उपलब्ध करण्यात आले आहे. याची खासियत म्हणजे या मॉडेलमध्ये कडा विरहीत (बेझललेस) आणि १९:८ असा अस्पेक्ट रेशो असणारा फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले होय. अर्थात कंपनीने या मालिकेत प्रथमच या प्रकारातील डिस्प्ले सादर केला आहे. हा डिस्प्ले ५.४५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १३६६ बाय ७६८ पिक्सल्स क्षमतेचा असून यावर २.५ डी वक्राकार ग्लास प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये मीडियाटेकचा क्वाड-कोअर एमटी ६७३९ डब्ल्यूए हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिलेली आहे.
पॅनासोनिक पी१०१ या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशयुक्त ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. याचे मूल्य ६,९९९ रूपये असून याला आयडियाच्या कॅशबॅक ऑफरसह लाँच करण्यात आले आहे. अर्थात या माध्यमातून ग्राहकाला २,००० रूपयांचा कॅशबॅक मिळणार असून सोबत ६० जीबी मोफत फोर-जी डाटा मिळेल.