तुम्हीही तुमचे Passwords ब्राउजरमध्ये सेव्ह करता? आताच करा ‘हे’ काम, नाही तर पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 07:51 PM2022-02-21T19:51:40+5:302022-02-21T19:51:55+5:30
इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे अनेक ऑनलाइन अकाऊंट्स बनवावे लागतात. त्यांचे पासवर्ड्स देखील लक्षात ठेवावे लागतात. अशावेळी अनेकजण पासवर्ड्स क्रोम किंवा अन्य ब्राउजर्सवर सेव्ह करून ठेवतात.
सध्या इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे अनेक अॅप्स आणि वेबसाईट्सवर अकाऊंट बनवावं लागतं. एवढ्या अकाऊंट्सचे पासवार्ड्स लक्षात ठेवणे देखील कठीण काम आहे. अशावेळी, गुगल क्रोम आणि अन्य ब्राउजर्समधील ‘रिमेम्बर पासवर्ड्स’ फीचरची मदत घ्यावी लागते. इथे तुमचे पासवर्ड्स आपोआप सेव्ह होतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा इन्सर्ट देखील होतात. परंतु या फीचरचा वापर सुरक्षित आहे का?
Google Chrome
क्रोम तुमचा ई-मेल आणि पासवर्ड एका ‘सीक्रेट की’ सह एन्क्रिप्ट करतो, त्यामुळे फक्त फक्त तुमच्या डिवाइसवरून पासवर्ड अॅक्सेस करता येतो. तुमचे पासवर्ड्स गुगलला देखील अॅक्सेस करता येत नाहीत. तुम्हाला देखील हे पासवार्ड्स अॅक्सेस करण्यासाठी तुमच्या जी-मेल आयडीच्या पासवर्डची आवश्यकता असते. त्यामुळे तुमचे सर्व पासवर्डस एकाच वेळी अॅक्सेस करता येत नाहीत.
अन्य ब्राउजर्सची सुरक्षा कशी आहे?
क्रोमच्या पासवर्ड मॅनेजरमध्ये पासवर्ड अॅक्सेस करण्यासाठी जीमेल आयडीचा पासवर्ड विचारला जातो. क्रोमच्या या स्टेपमुळे पासवर्ड सुरक्षित राहतात. परंतु मोजिला फायरफॉक्स सारख्या अन्य ब्राउजरमध्ये चुकीच्या अॅक्टिविटीचा अलर्ट मिळत नाही. परंतु याचा थेट अर्थ या प्लेटफॉर्म्सवर पासवर्ड सेव्ह करणे योग्य नाही असा होत नाही.
त्वरित करा हे काम
जर तुमच्या सोशल मीडिया किंवा अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचे पासवर्ड्स तुम्ही पासवर्ड मॅनेजरमध्ये केले असतील तर ते त्वरित काढून टाकावे. हे पासवर्ड्स तुम्ही लिहून ठेऊ शकता. जर तुमचं जी-मेल अकाऊंटचं हॅक झालं तर तुमचे सर्व पासवर्ड्स सहज हॅकर्सच्या हाती लागू शकतात. तसेच तुमच्या प्रत्येक अकाऊंटवर पासवर्ड सह ‘टू फॅक्टर ऑथेन्टिकेशन’ चा वापर करावा, जेणेकरून सुरक्षा डबल होईल.