2000 द्या आणि OPPO चा फाडू 5G Smartphone घेऊन जा; जाणून घ्या ‘ही’ भन्नाट Offer
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 05:55 PM2022-02-16T17:55:32+5:302022-02-16T17:56:07+5:30
Amazon Offers: OPPO A74 5G स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटनंतर 20990 रुपयांचा हा स्मार्टफोन फक्त 2,040 मध्ये विकत घेता येईल.
Amazon वर रोज एक स्पेशल डील उपलब्ध होते. आजच्या डीलमध्ये OPPO A74 5G स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटनंतर 20990 रुपयांचा हा स्मार्टफोन फक्त 2,040 मध्ये विकत घेता येईल. यासाठी थेट डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरची मदत मात्र घ्यावी लागेल. चला जाणून घेऊया या अविश्वसनीय ऑफर बद्दल सर्वकाही.
OPPO A74 5G वरील ऑफर आणि डिस्काउंट
OPPO A74 5G च्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची मूळ किंमत 20,990 रुपये आहे. परंतु अॅमेझॉनवर फक्त आजचा दिवस हा स्मार्टफोन 16,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या हँडसेटची खरेदी करताना तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्ही 14,950 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. योग्य स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास OPPO A74 5G स्मार्टफोन फक्त 2,040 रुपयांमध्ये तुमचा होईल. किंवा तुम्ही Citi बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून 1500 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळवू शकता.
Oppo A74 5G चे स्पेक्स
OPPO A74 5G बाजारात 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड कलरओएस 11 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वाॅलकाॅमचा 480 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 619 जीपीयू देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी OPPO A74 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स आहे. डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पावर बॅकअपसाठी या ओप्पो फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे देखील वाचा:
- काही दिवसांपूर्वी आलेल्या नव्या Smart TV टीव्हीवर तगडा डिस्काउंट; अशी 43 इंचाच्या Redmi Smart TV वरील ऑफर
- बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला Realme 9 Pro Plus; 60W चार्जिंग स्पीड काही मिनिटांत फुलचार्ज करणार स्मार्टफोन