फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या काही फिचर्ससाठी द्यावे लागणार पैसे? असा आहे मेटाचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 01:24 PM2022-09-03T13:24:51+5:302022-09-03T13:25:27+5:30
Facebook, Instagram & WhatsApp: मेटा प्लॅटफॉर्म एक नवा ग्रुप तयार करत आहे. ज्याचं विशेष लक्ष हे असे प्रॉडक्ट आणि फीचर्स तयार करण्यावर असेल, ते युझर्स खरेदी करू शकतील.
वॉशिंग्टन - मेटा प्लॅटफॉर्म एक नवा ग्रुप तयार करत आहे. ज्याचं विशेष लक्ष हे असे प्रॉडक्ट आणि फीचर्स तयार करण्यावर असेल, ते युझर्स खरेदी करू शकतील. याचा अर्थ मेटा प्लॅटफॉर्म इंक लवकरच आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर असे फीचर आणत आहेत ज्यासाठी युझरला पैसे द्यावे लागू शकतात.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार मेटाच्या एका प्रवक्त्यांनी याची माहिती दिली आहे. प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी या पेमेंटवाल्या प्रॉडक्ट्सला वेगळ्या पद्धतीने सादर करेल, तसेच सध्याच्या प्रॉडक्ट लागू केले जाणार नाही.
यावर्षी जून महिन्यामध्ये मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबूक आणि इन्स्टावर काही असे फीचर्स आणले जातील ज्यामधून क्रिएटर्सना पैसे कमावण्याची संधी दिली जाईल, अशी घोषणा केली होती.
फेसबुकचे सीईओ झुकरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, कंपनी २०२४ पर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कुठल्याही प्रकारच्या रेव्हेन्यू शेअरिंगवर प्रतिबंध असतील. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, आम्ही २०२४ पर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्व रेव्हेन्यू शेअरिंगवर स्थगिती देण्यात येईल, यामध्ये पेड ऑनलाईन इव्हेंट, सब्सक्रिप्शन, बॅज आणि बुलेटिनचा समावेश आहे.