Paytm ची जबरदस्त ऑफर, वीजेचं बिल भरल्यावर पूर्ण पैसे परत मिळवा! जाणून घ्या डील...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 04:44 PM2022-12-16T16:44:06+5:302022-12-16T16:46:18+5:30

Paytm नं Bijlee Days ची घोषणा केली आहे. यात Paytm वरुन तुमचं विजेचं बिल तुम्ही भरलं तर बंपर फायद्याचा लाभ घेता येणार आहे.

paytm has a good news for users who pay electricity using the app 100 percent cashback | Paytm ची जबरदस्त ऑफर, वीजेचं बिल भरल्यावर पूर्ण पैसे परत मिळवा! जाणून घ्या डील...

Paytm ची जबरदस्त ऑफर, वीजेचं बिल भरल्यावर पूर्ण पैसे परत मिळवा! जाणून घ्या डील...

googlenewsNext

Paytm नं Bijlee Days ची घोषणा केली आहे. यात Paytm वरुन तुमचं विजेचं बिल तुम्ही भरलं तर बंपर फायद्याचा लाभ घेता येणार आहे. कंपनीनं पेटीएमच्या माध्यमातून विजेचं बिल भरणाऱ्यांना १०० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि अॅडिशनल रिवॉर्ड्सची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी युझरला दरमहा १० ते १५ तारखेच्या आत बिल भरावं लागणार आहे. 

पेमेंट अॅप Paytm वर १०० टक्के कॅसबॅक आणि २ हजार रुपयांपर्यंतचा फायदा कमीत कमी ५० यूझर्सना मिळणार आहे. पण यात जे लोक फक्त पेटीएमच्या माध्यमातून विजेचं बिल भरतील तेच यासाठी पात्र ठरतील. तसंच यूझर्सना टॉप शॉपिंग आणि ट्रॅव्हल ब्रांड्सवरही डिस्काऊंट व्हाउचर दिले जात आहेत. 

पेटीएमनं पहिल्यांदाच विजेचं बिल भरणाऱ्या युझर्सना २०० रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकची सुविधा ऑफर केली आहे. अर्थात यात प्रोमो कोडचा वापर करावा लागणार आहे. पहिल्यांदाच पेटीएमच्या माध्यमातून बिल भरणारे यूझर्स 'ELECNEW200' या ऑफर कोडचा वापर करू शकतात. 

यूझर्सना बिल भरण्यासाठी Paytm वर मल्टीपल पेमेंट पर्याय देण्यात आला आहे. यूझर्स विजेचं बिल Paytm UPI, Paytm Waller, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून भरू शकतात. Paytm पोस्टपेड फिचर देखील ऑफर करतं. यातून युझर आधी बिल भरुन त्यासाठीची रक्कम नंतर भरू शकतो. 

Paytm वर कसं भरायचं विजेचं बिल?
सर्वात पहिलं तुम्हाला Paytm च्या वेबपेजवर जावं लागेल. तिथं होमपेजवर Recharges and Bill Payments पर्यायावर क्लिक करा. यातील Electricity बिल पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचं इलेक्ट्रिसिटी बोर्ड निवडावं लागेल. पुढे कस्टमर आयडेन्टिफिकेशन नंबर नमूद करा. हा तुम्हाला तुमच्या विजेच्या बिलावर मिळून जाईल. Proceed पर्यायावर क्लिक करा. मग Paytm तुम्हाला तुमच्या बिलाची रक्कम किती आहे ते दाखवेल. बिलाची रक्कम भरण्यासाठी पेमेंट ऑप्शन विचारण्यात येईल. त्यातील तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडा आणि Proceed With tha payment पर्यायावर क्लिक करा. 

पेमेंट करण्यासाठी तुम्ही Paytm UPI, Paytm Waller, क्रेडिट कार्ड, डेबिट र्काड आणि नेटबँकिंगचा सुद्धा वापर करू शकता. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल तसंच पेमेंटची पावती देखील दिसेल ती डाऊनलोड करुन घ्या. 

Web Title: paytm has a good news for users who pay electricity using the app 100 percent cashback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Paytmपे-टीएम