आता आधार कार्ड, DL व RC सोबत बाळगण्याची गरज नाही! Paytm अ‍ॅपमध्ये इंटिग्रेट झाले डिजिलॉकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 09:59 PM2021-10-13T21:59:36+5:302021-10-13T22:07:20+5:30

Paytm Has Integrated The Digilocker : या इंटिग्रेशनमुळे पेटीएम युजर्संना डिजिलॉकरद्वारे त्यांच्या सर्व सरकारी रेकॉर्ड्सला अ‍ॅक्सेस करण्याची सुविधा मिळेल. युजर्स ऑफलाइन असतानाही याचा वापर केला जाऊ शकतो.

Paytm Has Integrated The Digilocker Via Mini App Store No Need To Carry Paytm Users Can Now Store Aadhar, DL and RC | आता आधार कार्ड, DL व RC सोबत बाळगण्याची गरज नाही! Paytm अ‍ॅपमध्ये इंटिग्रेट झाले डिजिलॉकर

आता आधार कार्ड, DL व RC सोबत बाळगण्याची गरज नाही! Paytm अ‍ॅपमध्ये इंटिग्रेट झाले डिजिलॉकर

googlenewsNext

नवी दिल्ली :  डिजिटल पेमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिस कंपनी पेटीएमच्या (Paytm) युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आहे.दरम्यान, आता पेटीएम युजर्स डिजीलॉकरचा (Digilocker) वापर करु शकणार आहेत. कंपनीने आपल्या मिनी-अ‍ॅप स्टोअरद्वारे (Mini-App Store) डिजीलॉकरला इंटिग्रेट केले आहे. डिजीलॉकर हे एक प्रकारचे व्हर्च्युअल लॉकर आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून उपलब्ध करण्यात आलेले हे क्लाउड आधारित प्लॅटफॉर्म आहे. (Paytm Has Integrated The Digilocker Via Mini App Store No Need To Carry Paytm Users Can Now Store Aadhar, DL and RC)

या इंटिग्रेशनमुळे पेटीएम युजर्संना डिजिलॉकरद्वारे त्यांच्या सर्व सरकारी रेकॉर्ड्सला अ‍ॅक्सेस करण्याची सुविधा मिळेल. युजर्स ऑफलाइन असतानाही याचा वापर केला जाऊ शकतो. पेटीएम युजर्स आता डिजिलॉकरद्वारे आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन आरसी आणि विमा यांसारखे डॉक्युमेंट्स सेव्ह करू शकतील.

डिजिलॉकरद्वारे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्स सारखे डॉक्युमेंट्सला स्टोअर आणि मिळवले जाऊ शकते. युजर्स सेल्फ केवायसी आणि व्हिडिओ केवायसीसाठी डिजीलॉकरवरील असलेले डॉक्युमेंट्सचा वापर करू शकतात. तसेच, ज्या युजर्संनी पेटीएमद्वारे कोरोनाची लस बुक केली आहे, ते डिजिलॉकरवर त्यांचे व्हॅक्सिन सर्टिफिकेट अ‍ॅड करू शकतात.

डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी आणि अ‍ॅक्सेससाठी युजर्सला पेटीएम अ‍ॅपवरील आपल्या डॉक्युमेंट्समध्ये प्रोफाइल सेक्शनवर जावे लागेल. डिजिलॉकरवर एकदा डॉक्युमेंट्सला अ‍ॅड केल्यानंतर त्यांना इंटरनेटची कमी कनेक्टिव्हिटी असली किंवा ऑफलाइन असला तरीही अ‍ॅक्सेस केले जाऊ शकता.

Web Title: Paytm Has Integrated The Digilocker Via Mini App Store No Need To Carry Paytm Users Can Now Store Aadhar, DL and RC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.