Paytm म्युझिक साउंडबॉक्स भारतात लाँच, पेमेंटसह म्युझिकचा घ्या आनंद...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 09:05 PM2023-08-01T21:05:41+5:302023-08-01T21:06:02+5:30
पेटीएम साउंडबॉक्स तुमच्या खिशात सहज बसू शकतो.
नवी दिल्ली : पेटीएमने पॉकेट साउंडबॉक्स आणि पेटीएम म्युझिक साउंडबॉक्स लाँच केले आहेत. ही एक 4G इनेबल्ड पेमेंट सिस्टम आहे. पेटीएम पॉकेट साउंडबॉक्स पहिले पोर्टेबल उपकरण आहे. सध्या पेटीएम साउंडबॉक्स उपलब्ध आहे. पण त्यामध्ये म्युझिकचा ऑप्शन अद्याप उपलब्ध नव्हता. पण आता पेटीएमने एक नवा पॉकेट साउंडबार लाँच केला आहे.
पेटीएम साउंडबॉक्स तुमच्या खिशात सहज बसू शकतो. या पेटीएम साउंडबॉक्सचा आकार डेबिट कार्डाइतका लहान आहे. अशा स्थितीत हा साउंडबार इकडे-तिकडे सहज घेऊन जाऊ शकता. त्यामुळे अशा स्थितीत व्यावसायिक गतिविधींना वेग येईल, अशी शक्यता आहे. हा साउंडबार युजर्संना झटपट पेमेंटचा ऑडिओ अलर्ट देतो. तसेच, याची बॅटरी ५ दिवसांची आहे. यात 4G कनेक्टिव्हिटी आहे. याचप्रमाणे जर तुमच्याकडे कमी प्रकाश असेल तर त्यात एक टॉर्च उपलब्ध आहे, ज्यामुळे पेमेंट केले जाऊ शकते.
म्युझिकसोबत मिळेल पेमेंटचे नोटिफिकेशन
पेटीएम म्युझिक साउंडबॉक्स एक स्पीकर म्हणून काम करतो. तसेच, ते पेमेंटचे नोटिफिकेशन देते. ब्लूटूथच्या मदतीने फोनशी कनेक्ट करूनही म्युझिक ऐकता येते. फोनमध्ये 7 दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. तसेच 4G कनेक्टिव्हिटीही दिली जाईल. वॉचमध्ये 4 वॅटचा पॉवरफुल स्पीकर उपलब्ध असणार आहे. पेटीएम साउंडबार व्हॉईस ओव्हरले फीचर्ससह येतो, जो व्यापार्यांना म्युझिक चालू असताना देखील पेमेंटचे नोटिफिकेशन ऐकू येईल.
काय आहे फायदा?
तुम्हाला माहिती आहे की पेटीएम साउंडबार तुमच्या प्रत्येक पेमेंटचे नोटिफिकेशन देतो. पण आता तुम्ही पेमेंट नोटिफिकेशन्ससोबत म्युझिक साउंडर बार म्हणून याचा वापर करू शकाल.