Paytm चे शानदार फीचर! तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? आता कुठे पोहोचली?... हे लगेच समजणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 12:48 PM2022-08-11T12:48:19+5:302022-08-11T14:34:06+5:30
Paytm : कोणीही आता पेटीएम अॅपचा (Paytm App) वापर थेट ट्रेनच्या धावण्याच्या स्थितीचा मागोवा (PNR Status tracking) घेण्यासाठी करू शकतो.
नवी दिल्ली : पेटीएम (Paytm) अनेक नवीन फीचर्स आणत आहे, त्यामध्ये सर्व प्लॅटफॉर्मवरील सुविधा वाढवत आहेत. ट्रेन प्रवाशांसाठी पेटीएम ट्रेन तिकीट बुक करण्याची क्षमता प्रदान करते आणि आता कंपनीने संबंधित सुविधांचा विस्तार केला आहे. पेटीएमवर प्रवासी आता आपल्या प्रवासाचे PNR स्टेटस ट्रॅक (Paytm Live Train Status) करू शकतील. याव्यतिरिक्त, कोणीही आता पेटीएम अॅपचा (Paytm App) वापर थेट ट्रेनच्या धावण्याच्या स्थितीचा मागोवा (PNR Status tracking) घेण्यासाठी करू शकतो. यामुळे आता प्रवाशांना वेबसाइटवर अवलंबून राहणे टाळता येऊ शकेल.
युजर्सना अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर पेटीएम अॅप (Paytm App) लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावे लागेल. एकदा अपडेट केल्यानंतर तुम्ही लिस्टेड या सुविधा शोधण्यासाठी लिस्टमधून स्क्रोल करू शकता. मात्र, सुविधा शोधण्यासाठी अॅपमधील सर्च फंक्शन वापरणे हा सोपा मार्ग आहे; पेटीएम अॅपमध्ये (Paytm App) अनेक सुविधा लिस्टेड आहेत.
Paytm Live Train Status, PNR Status tracking ची घोषणा
ज्या लोकांना थेट ट्रेनची स्थिती ट्रॅक करण्यात स्वारस्य आहे, त्यांच्यासाठी प्रक्रिया सोपी आहे -
- पेटीएम अॅपवर जा आणि ट्रेनचे स्टेटस शोधा.
- पेटीएम ट्रॅव्हल सेक्शन ओपन होईल, ज्याद्वारे तुम्ही ट्रेन, बस, फ्लाइट इत्यादी ट्रॅक करू शकता.
- तुम्हाला 'ट्रेन' ऑप्शन निवडावा लागेल. येथे तुम्हाला PNR स्टेटस, लाइव्ह ट्रेन स्टेटस, ट्रेन कॅलेंडर आणि ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याचा ऑप्शन मिळेल.
- तुम्ही ट्रेन नंबर इनपुट करू शकता आणि सर्च फंक्शनवर टॅप करू शकता.
- एकदा तुम्ही माहिती प्रविष्ट केल्यानंतर, अॅप येणारे स्टेशन, शेवटचे स्टेशन, जवळचे स्टेशन, प्रवासासाठी शिल्लक वेळ, प्लॅटफॉर्म डिटेल्स, आगमन आणि प्रस्थान वेळ आणि अपेक्षित आगमन वेळ यासह सर्व प्रवासाची माहिती दाखवेल.
- त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या तिकीट बुकिंगची स्थिती तपासण्यासाठी तुमचा पीएनआर नंबर इनपुट करू शकता.
- तुम्ही ट्रेन कॅलेंडर देखील पाहू शकता, ज्यामध्ये तुम्ही एका आठवड्यात धावणाऱ्या रेल्वेचे दिवस आणि सर्व वर्गातील जागांची उपलब्धता पाहण्यास सक्षम असाल.
Paytm च्या अनेक सुविधा
पेटीएमचे म्हणणे आहे की, कोणीही हिंदी, बांगला, तेलुगु, मराठी, तमिळ, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, ओडिया आणि बरेच काही अशा 10 पेक्षा जास्त भाषांमध्ये बुक करू शकतो. कंपनी म्हणते की कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा छुपे खर्च करावा लागत नाही. तसेच, ग्राहक ज्येष्ठ नागरिक कोट्याचा लाभ घेऊ शकतात, म्हणजे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे पुरुष प्रवासी आणि 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला प्रवासी लोअर बर्थ तिकीट बुक करू शकतात. सर्व पेमेंट यूपीआयद्वारे सुरू केले जातील आणि ते शून्य पेमेंट गेटवे (PG) शुल्कासह येतात.