सावधान! क्रोम ब्राऊजरमध्ये पासवर्ड सेव्ह केलेत? तुमच्या सर्व ऑनलाईन अकॉउंटसच्या सुरक्षेसाठी आत्ताच घ्या ही अ‍ॅक्शन

By सिद्धेश जाधव | Published: January 3, 2022 12:08 PM2022-01-03T12:08:19+5:302022-01-03T12:08:38+5:30

जर तुम्ही गुगल Chrome आणि मायक्रोसॉफ्ट Edge मध्ये लॉगिन पासवर्ड सेव्ह करून ठेवले असतील तर तुम्हाला त्यावर अ‍ॅक्शन घ्यावी लागेल.  

People saving login passwords via google chrome browser have to check this website  | सावधान! क्रोम ब्राऊजरमध्ये पासवर्ड सेव्ह केलेत? तुमच्या सर्व ऑनलाईन अकॉउंटसच्या सुरक्षेसाठी आत्ताच घ्या ही अ‍ॅक्शन

सावधान! क्रोम ब्राऊजरमध्ये पासवर्ड सेव्ह केलेत? तुमच्या सर्व ऑनलाईन अकॉउंटसच्या सुरक्षेसाठी आत्ताच घ्या ही अ‍ॅक्शन

Next

आपण सध्या इंटरनेटवर जास्त अवलंबुन आहोत. कोरोना काळात इंटरनेटचा जेवढा वापर वाढला आहे तेवढे सायबर गुन्हे देखील वाढले आहेत. सायबर गुन्हेगार डेटा, माहिती, अकॉउंटस, पासवर्ड इत्यादी चोरत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. एखाद्या मालवेयरनं तुमच्या डिवाइसमध्ये शिरकाव केला तर ते तुमच्या ब्राऊजरमधील क्रेडिट कार्ड डिटेल्स, ऑटो कम्प्लिट लॉगिन डिटेल्स देखील चोरू शकतं. त्यामुळे गुगल Chrome आणि मायक्रोसॉफ्ट Edge वापरणाऱ्या लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  

अनेक वेबसाईट्सवरील अकॉउंटस आणि पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण असतं म्हणून लोक क्रोम आणि एजवरील ऑटो कम्प्लिट लॉगिन पासवर्ड फीचरचा वापर करता. परंतु सायबर गुन्हेगार हा डेटा चोरून त्याचा गैरवापर करू शकतात. अलीकडेच 4,41,000 अकॉउंट डिटेल्स चोरीला जाऊन ते हॅक झाल्याची माहिती आली आहे. Haveibeenpwned.com या वेबसाईटवर या चोरीला गेलेल्या अकॉउंटसची माहिती देण्यात आली आहे. ही वेबसाईट युजरचा ईमेल आयडी चोरीला गेलेल्या डाटा बेसमध्ये आहे का ते चेक करते.  

तुमचा डेटा चोरीला गेला आहे कि नाही कसे बघायचे?  

Haveibeenpwned.com या वेबसाईटवर डेटा लिक्सची माहिती दिली जाते. जर या वेबसाईटनं तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस RedLine द्वारे वापरला गेला आहे, असं संगितलं तर तुम्हाला तुमच्या सर्व अकॉउंटसचा पासवर्ड बदलणं आवश्यक आहे.  

RedLine मालवेयर म्हणजे काय? 

RedLine मालवेयर माहिती चोरण्याचं काम करतो. मार्च 2020 मध्ये हा मालवेयर सर्वप्रथम डार्क वेबवर दिसला होता. हा मालवेयर सहज युजरच्या वेगवेगळ्या वेबसाईटच्या अकॉउंटची माहिती आणि पासवर्डस चोरू शकतो आणि तुमच्या कंपनीचा विपीएन देखील अ‍ॅक्सेस करू शकतो.  

अकॉउंट पासवर्डस कसे वाचवायचे?  

या मालवेयरपासून वाचण्यासाठी वेब ब्राऊजरमध्ये पासवर्डस आणि अकॉउंट डिटेल्स सेव्ह करू नये.  

हे देखील वाचा:

OMG! फक्त 7.5 हजारांत दमदार LED TV; नवीन वर्षात Flipkart देतंय बंपर डिस्काउंट

4 जानेवारीपासून डब्बा होणार हे स्मार्टफोन्स; स्वतः कंपनीनं केली घोषणा, कॉल-मेसेज देखील होणार बंद

Web Title: People saving login passwords via google chrome browser have to check this website 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.