कुलपॅड नोट ५ लाईट सी: फिचर्स आणि मूल्य

By शेखर पाटील | Published: August 8, 2017 12:44 PM2017-08-08T12:44:52+5:302017-08-08T12:45:30+5:30

कुलपॅड कंपनीने भारतात आपला कुलपॅड नोट ५ लाईट सी हा स्मार्टफोन ७,७७७ रूपये मूल्यात लाँच केला असून शनिवारपासून हे मॉडेल देशभरातील ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

Permalink : coolpad note 5 light c : know all features | कुलपॅड नोट ५ लाईट सी: फिचर्स आणि मूल्य

कुलपॅड नोट ५ लाईट सी: फिचर्स आणि मूल्य

googlenewsNext

कुलपॅड कंपनीने भारतात आपला कुलपॅड नोट ५ लाईट सी हा स्मार्टफोन ७,७७७ रूपये मूल्यात लाँच केला असून शनिवारपासून हे मॉडेल देशभरातील ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

कुलपॅड नोट ५ लाईट सी हे मॉडेल देशभरातल्या आघाडीच्या शॉपीजमधून ग्रे आणि गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात येत आहे. अर्थात कुलपॅड कंपनीने आपली स्ट्रॅटेजी बदलून ऑफलाईन विक्रीचा अवलंब केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. या वर्षी मार्च महिन्यात कुलपॅड कंपनीने कुलपॅड नोट ५ हे मॉडेल लाँच केले होते. आता याचीच नवीन आवृत्ती ‘सी’ या मॉडेलच्या माध्यमातून सादर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मेटल बॉडी प्रदान करण्यात आली असून मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आले आहे. यातील डिस्प्ले पाच इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा असून यावर २.५ डी ग्लास प्रदान करण्यात आला आहे. 

कुलपॅड नोट ५ लाईट सी हे मॉडेल १.२ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसरने युक्त आहे. विशेष म्हणजे यात अड्रेनो ३०४ ग्राफीक प्रोसेसरही असल्यामुळे यावर गेमिंगचा उत्तम अनुभव घेणे शक्य असल्याचा कंपनीने दावा केला आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची व्यवस्था असेल. ऑटो-फोकस, इनबिल्ट फ्लॅश आणि एफ/२.४ अपार्चरसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. कुलपॅड नोट ५ लाईट सी या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय यात एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस आदी फिचर्स तसेच लाईट सेन्सर व अ‍ॅक्सलेरोमीटर देण्यात आलेले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१ नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल.

कुलपॅड नोट ५ लाईट सी या मॉडेलचे मूल्य आणि फिचर्सचा विचार करता मोटो सी प्लस, शाओमी रेडमी ४ आणि अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या यू युनिक २ या स्मार्टफोन्सशी याची स्पर्धा असेल असे स्पष्ट आहे. उर्वरित मॉडेल्सपेक्षा याचे जास्त मूल्य हा एक फॅक्टर या स्मार्टफोनसाठी थोडा अडचणीचा ठरू शकतो. 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Permalink : coolpad note 5 light c : know all features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.