PF Withdrawal च्या आधी Online करुन घ्या 'हे' महत्वाचं काम, मग तुमचा एक रुपयाही बुडणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 18:33 IST2023-03-28T18:32:58+5:302023-03-28T18:33:50+5:30
जर तुम्ही PF काढण्याचा विचार करत असाल तर त्याआधी काही महत्वाची कामं करणं गरजेचं असतं.

PF Withdrawal च्या आधी Online करुन घ्या 'हे' महत्वाचं काम, मग तुमचा एक रुपयाही बुडणार नाही!
जर तुम्ही PF काढण्याचा विचार करत असाल तर त्याआधी काही महत्वाची कामं करणं गरजेचं असतं. ती न केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. असं अनेकांसोबत घडलं देखील आहे. भविष्य निर्वाह निधी कायमचा सुरक्षित कसा करायचा ते जाणून घेऊयात...
EPFO वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला प्रथम लॉग इन करावं लागेल. पुढे तुम्ही 'View' वर जाल. यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यातील सर्व्हिस हिस्ट्रीवर क्लिक करा. येथे एक संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल आणि तुमच्या सर्व जुन्या कंपन्यांचं तपशील या यादीत नोंदवले जातील. पण इथून तुम्ही तुमचा भविष्य निर्वाह निधी काढू शकणार नाही.
भविष्य निर्वाह निधी काढण्यापूर्वी, तुम्हाला One Member पर्यायावर क्लिक करावं लागेल. लॉग इन करताच 'Online Services' वर जा. येथे तुम्हाला 'वन मेंबर-वन ईपीएफ अकाउंट'चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केलं की तुम्ही तुमच्या मागील संस्थेचे सर्व निधी सध्याच्या संस्थेच्या पीएफ खात्यात ट्रान्सफर करू शकता.
कोणताही PF काढण्यासाठी तुमचा सर्व निधी सध्याच्या चालू खात्यात असणं आवश्यक आहे. म्हणूनच तुम्ही नेहमी भविष्य निर्वाह निधी ट्रान्सफर करून घेतलं पाहिजे. यानंतर तुम्ही ते करंट एम्प्लॉयरच्या खात्यातून काढू शकाल. पण यासाठीही तुम्हाला आधी अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील. नोकरी सोडल्यानंतरही कर्मचारी पीएफ ट्रान्सफर करत नाहीत आणि कंपनी बंद पडल्यास मोठे नुकसानही होऊ शकतं, असं अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलं आहे. अशा परिस्थितीत तुम्ही नोकरी सोडल्यानंतर लगेचच पीएफ ट्रान्सफर करणं खूप महत्त्वाचं आहे.