अरे वा! इयरबड्सने करता येणार स्मार्टफोन चार्ज; जाणून घ्या Philips च्या नव्या इयरबड्सची वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 06:51 PM2021-08-06T18:51:40+5:302021-08-06T18:52:06+5:30
Philips ने भारतात दोन नवीन ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इयरबड्स लाँच केले आहेत.
Philips ने भारतात दोन नवीन ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इयरबड्स लाँच केले आहेत. हे बँड्स कंपनीने Philips SBH2515BK/10 आणि TAT3225BK नावाने सादर केले आहेत. यातील Philips SBH2515BK/10 चा वापर पावर बॅंक म्हणून देखील करता येईल. तर Philips TAT3225BK मध्ये IPX4 वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे.
Philips SBH2515BK/10, TAT3225BK ची किंमत
Philips SBH2515BK/10 TWS भारतात 9,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले आहेत. तर Philips TAT3225BK ची किंमत 7,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही इयरबड्स 9 ऑगस्टपर्यंत Flipkart क्रमशः 4,999 रुपये आणि 2,499 रुपयांमध्ये विकत घेता येतील.
Philips SBH2515BK/10 चे स्पेसिफिकेशन्स
Philips SBH2515BK/10 इयरबड्समध्ये 6mm नियोडियम अक्यूस्टिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. तसेच पॅसिव नॉइज आइसॉलेशनसाठी ओवल-शेप ट्यूब देण्यात आली आहे. या बड्स मधील मोनो मोड युजर्सना एम्बिएन्ट नॉइज ऐकण्यास मदत करतो. या फिलिप्स इयरबड्समध्ये ब्लूटूथ 5.0 आहे त्यामुळे यात 10 मीटरची रेंज मिळते. Philips SBH2515BK/10 च्या चार्जिंगमधील 3,350mAh ची बॅटरी पावर बॅंकप्रमाणे वापरता येते. सिंगल चार्जवर केससह 110 तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो.
Philips TAT3225BK चे स्पेसिफिकेशन्स
Philips TAT3225BK मध्ये 13mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत आणि यात ब्लूटूथ वी5.1 आहे. हे इयरबड्स IPX4 वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे. Philips TAT3225BK चार्जिंग केससह 24 तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो. ही केस 2 तासांत इयरबड्स फुल चार्ज होते. इयरबड्समधील बिल्ट-इन बॅटरी सिंगल चार्जवर 6 तासांचा प्लेबॅक टाइम देते.