Philips नं लॉन्च केले दमदार स्पिकर्स, डिझाइननं जिंकली अनेकांची मनं; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरंच काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 04:17 PM2022-01-26T16:17:24+5:302022-01-26T16:18:07+5:30
फिलिप्स (Philips) कंपनीचे लायसन्स पार्टनर टीपीवी टेक्लोलॉजीनं मंगळवारी भारतात ऑडिओ प्रोडक्ट्सच्या एका नव्या सीरीजचं अनावरण केलं.
नवी दिल्ली-
फिलिप्स (Philips) कंपनीचे लायसन्स पार्टनर टीपीवी टेक्लोलॉजीनं मंगळवारी भारतात ऑडिओ प्रोडक्ट्सच्या एका नव्या सीरीजचं अनावरण केलं. यात टीडब्ल्यूएस, पार्टी स्पिकर आणि हेडफोनचा समावेश आहे. फिलिप्स टीडब्ल्यूएस टीएटी 2206 बीके (Phlilips TWS TAT2206BK) आणि टीएटी2236 बीके (Philips TWS TAT2236BK) या दोन स्पिकर्सची किंमत ६,९९९ रुपये इतकी आहे. तर दोन्ही स्पिकर्सची किंमत अनुक्रमे ३,४९९ रुपये आणि ३,३९९ रुपये अशा विशेष सवलतीत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
Philips TWS TAT2206BK And TAT2236BK Price
फिलिप्स टीएए4216बीके हेडफोन ८,९९९ रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आलं आङे. टीएएक्स5206 आणि टीएएक्स 3206 पार्टी स्पिकरची किंमत अनुक्रमे २१,९०० आणि १५,९९० रुपये इतकी आहे. टीपीवी टेक्नोलॉजी इंडियाचे कंट्री हेड शैलेश प्रभू म्हणाले की, "नव्या फिलिप्स ऑडिओ रेंजमध्ये आमच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता तयारी करण्यात आली आहे. ३५ तास क्षमतेचा प्लेटाइम, नॉइज आयसोलेशन आणि आयपी ५५ वॉटर/डस्ट प्रोटेक्शनसह नवे हेडफोन एक उत्तम पर्याय आहे"
जबरदस्त साऊंड
ऑडिओ सिस्टम लेटेस्ट ब्लूटूथ कनेक्टीव्हीटी आणि हाय वॉटर रेसिस्टेंसह उपलब्ध आहेत. फिलिप्स टीएटी २२०६ आणि टीएटी २२३६ बीके यूएसबी आणि चार्जिंगसह १८ तासांच्या प्लेटाइमसह उपलब्ध आहेत. पॅसिव्ह नॉइस आयसोलेशन आणि आयपीएक्स ४ स्पेशल-प्रूफ डिझाइन एक उत्तम ऑडिओ अनुभव प्रदान करतो.
यात मोनो मोड देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जो एका इअरबर्डचा वापर करुन टॉकटाइम दुप्पट करण्यास मदत करतो. तर दुसरा चार्जिंगला सपोर्ट करतो. या उत्पादनांची सीरीज लवकरच ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे.