तब्बल दोन महिने चालणार या फोनची बॅटरी; JioPhone ला टक्कर देणार का Philips चे तीन फिचर फोन  

By सिद्धेश जाधव | Published: August 16, 2021 11:41 AM2021-08-16T11:41:33+5:302021-08-16T11:48:29+5:30

Philips Xenium E Series: भारतीय बाजारात फिलिप्स ब्रँडच्या तीन नवीन फीचर्स फोनची घोषणा करण्यात आली आहे. हे फोन्स ‘ई’ सीरीजमध्ये सादर करण्यात आले आहेत.

Philips Xenium E125 E209 E102A feature phones launched in india | तब्बल दोन महिने चालणार या फोनची बॅटरी; JioPhone ला टक्कर देणार का Philips चे तीन फिचर फोन  

तब्बल दोन महिने चालणार या फोनची बॅटरी; JioPhone ला टक्कर देणार का Philips चे तीन फिचर फोन  

Next
ठळक मुद्दे Philips Xenium E125 ची किंमत 2,099 रुपये ठेवण्यात आली आहे.Philips Xenium E209 हा या सीरिज मधील महागडा फीचर फोन आहे.या सीरिजमधील सर्वात स्वस्त फोन म्हणजे Philips E102A.

2020 च्या शेवटच्या तिमाहीत जगातील एकूण फिचर फोन्सपैकी जवळपास 38% फोन्स भारतात शिप करण्यात आले होते. यावरून देशातील फिचर फोन बाजाराचा अंदाज लावता येईल. त्यामुळे स्मार्टफोन सेगमेंटसह फोन निर्मात्यांच्या नजारा फिचर सेगमेंटवर देखील आहेत. आज भारतीय बाजारात फिलिप्स ब्रँडच्या तीन नवीन फीचर्स फोनची घोषणा करण्यात आली आहे. हे फोन्स ‘ई’ सीरीजमध्ये सादर करण्यात आले आहेत. हे स्वस्त मोबाईल फोन Philips Xenium E209, Philips Xenium E125 आणि Philips E102A नावाने लाँच झाले आहेत. चला जाणून घेऊया या फोन्सचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.  

Philips Xenium E125 

Philips Xenium E125 मध्ये कंपनीने 1.77 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो MT6261M SoC वर चालतो. फिलिप्सच्या या फिचर फोनमध्ये एक QVGA कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन मायक्रोएसडी कार्ड आणि ब्लूटूथ 3.0 ला सपोर्ट करतो. या फोनमधील 2,000एमएएचची बॅटरी 1,500 तास म्हणजे 62 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. Philips Xenium E125 ची किंमत 2,099 रुपये ठेवण्यात आली आहे. 

हे देखील वाचा: अरे वा! मोफत मिळणार Jio Phone; कंपनीने सादर केल्या दोन ऑफर्स 

Philips Xenium E209 

Philips Xenium E209 हा या सीरिज मधील महागडा फीचर फोन आहे. या फोनमध्ये टी-9 कीपॅडसह 2.4-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. या फिचर फोनमध्ये टॉर्च लाईट देखील देण्यात आली आहे. मनोरंजनासाठी यात वायरलेस एफएम रेडिओ आणि म्युजिक प्लेयर देण्यात आले आहेत. ज्यांना 108db लाउड स्पिकरची जोड मिळते. या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 3.0 मिळते. हा फोन 1,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. Philips Xenium E209 ची किंमत 2,999 रुपये आहे. 

हे देखील वाचा: 108MP कॅमेरा असलेल्या मोटोरोला फोनची भारतीय किंमत लीक; जाणून घ्या Edge 20 आणि Edge 20 Fusion ची वैशिष्ट्ये

Philips E102A 

या सीरिजमधील सर्वात स्वस्त फोन म्हणजे Philips E102A. हा फोन 1.77 इंचाच्या टीएफटी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये जीपीआरएस आणि ब्लूटूथ 2.1 मिळते. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो म्यूजिक प्लेयर आणि वायरलेस एफएमसह सादर करण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने वाढवता येते. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 1,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Philips E102A ची किंमत कंपनीने 1,399 रुपये ठेवली आहे.  

Web Title: Philips Xenium E125 E209 E102A feature phones launched in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.