वेळीच व्हा सावध! तुम्ही फोनवर बोलताना 'असा' आवाज येतो?; तर समजा कॉल होतोय रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 07:31 PM2022-12-10T19:31:55+5:302022-12-10T19:39:38+5:30
Phone Call Recording: फोनवर बोलत असताना तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही हे जर माहीत करायचे असेल तर, त्यासाठी एक सोपी ट्रीक आहे.
फोन कॉल रेकॉर्ड करणे कायदेशीर नाही. पण काही वेळा महत्त्वाच्या आणि खासगी विषयांवर फोनवर बोलत असताना कोणी आपला कॉल रेकॉर्ड तर करत नाही अशी शंका ही हमखास येतेच. फोनवर बोलत असताना तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही हे जर माहीत करायचे असेल तर, त्यासाठी एक सोपी ट्रीक आहे.
जर तुम्हाला तुमचा फोन सुरू असताना कॉलच्या मधोमध सतत बीपचा आवाज ऐकू येत असेल, तर समजा तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. जर कोणी तुमचे कॉल रेकॉर्ड केला तर ते कायद्याचे उल्लंघन मानले जाते. विशेष म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करू शकता. तसेच, तुम्ही त्याच्याकडून नुकसानभरपाई घेऊ शकता.
Google ने सर्व Call Recording Apps बंद केले आहेत. हे सर्व बेकायदेशीर आहेत. याचाच अर्थ असा की, प्ले स्टोअरमधील कोणतेही App कॉल रेकॉर्डिंग फीचरसह येत असल्यास, त्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरीही फोनमध्ये दिलेले इन-बिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर अजूनही वापरले जाऊ शकते. याद्वारे तुमचे कॉल रेकॉर्डही केले जाऊ शकतात.
Google गेल्या काही वर्षांपासून कॉल रेकॉर्डिंग Apps आणि सेवांच्या विरोधात आहे. कंपनीच्या मते, कॉल रेकॉर्डिंग हे युजर्सच्या गोपनीयतेचे उल्लंघन आहे. या कारणास्तव, जेव्हा कधी कोणाचा कॉल त्यांच्या स्वत: च्या डायलर App मध्ये रेकॉर्ड केला जातो तेव्हा त्यात एक स्पष्ट मेसेज ऐकू येतो की, this call is now being recorded. हे कॉलर आणि रिसीव्हर दोघांनाही ऐकू येते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"