तुमच्या दारात अचानक रोबोट आला तर घाबरू नका, पिझ्झा पोहोचविणारा डिलिव्हरी बॉय असेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 03:28 PM2022-10-06T15:28:37+5:302022-10-06T15:29:08+5:30
सध्याच युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. इंटरनेटने आपल्या आयुष्यात अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. आता आपल्याला घरी बसून ऑनलाईन वस्तु तसेच जेवनही घरी मागवता येते.
नवी दिल्ली : सध्याच युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. इंटरनेटने आपल्या आयुष्यात अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. आता आपल्याला घरी बसून ऑनलाईन वस्तु तसेच जेवनही घरी मागवता येते. आता ऑनलाईन ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ घरी डिलिव्हरी करण्यासाठी रोबोट येणार आहेत.
याअगोदर खाद्यपदार्थ घरी पोहोचवण्याचे काम डिलिव्हरी बॉय करत होते, पण आता हे काम रोबोट करणार आहेत. पीझ्झा हट ही कंपनी सुविधा सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे.
Apple Watch Blast: मोबाईल आणि टीव्हीनंतर आता Apple Watchचा स्फोट? गरम होऊन फुटल्याचा युजरचा दावा...
पिझ्झा हटने रोबोट बनवणाऱ्या एका कंपनीसोबत करार केला आहे. सध्या या रोबोटची ट्रायल कॅनडा येथे घेण्यात आली आहे. या रोबोटची ट्रायल दोन आठवडे घेण्यात आली आहे. यात रोबोटचा वापर करण्यात आला होता. दुसऱ्या शहरातही ही ट्रायल घेण्यात येणार आहे.
No One OutDelivers The Hut! After decades of delivering to your homes, robots can now deliver food to your door in select Vancouver areas. pic.twitter.com/VuG4txn2zs
— Pizza Hut Canada (@PizzaHutCanada) September 26, 2022
रोबोट कसे काम करणार?
ग्राहकांनी पिझ्झा ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर आपल्याला रोबोटचे लोकेशन मिळणार आहे, यावरुन आपण रोबोटला ट्रॅक करु शकतो. पिझ्झा हटच्या अॅपमधून आपल्याला ऑर्डक करता येऊ शकते.
ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर ग्राहकाला एक युनिक पीन कोड येईल. त्या कोडच्या मदतीने तुम्ही रोबोट जवळ असणारी तुमची ऑर्डर घेऊ शकता.
फुड डिलिव्हरी क्षेत्रात हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. आता आम्ही या क्षेत्रात काम करणार असल्याचे पिझ्झा हटने म्हटले आहे. त्यामुळे आता खाद्यपदार्थ रोबोट तुम्हाला घरी पोहोचवणार आहेत. पण रोबोटच्या डिलिव्हरीला किती वेळ लागेल हे अजुनही सांगितलेले नाही.