कार्बन ऑरा नोट प्ले : मोठा डिस्प्ले, दर्जेदार बॅटरी !

By शेखर पाटील | Published: August 4, 2017 03:09 PM2017-08-04T15:09:17+5:302017-08-04T15:09:46+5:30

कार्बन कंपनीने आपला ऑरा नोट प्ले हा स्मार्टफोन ७,५९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला असून यात मोठा डिस्प्ले, दर्जेदार बॅटरी व फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे.

Play Carbon Aura Note: bigger display, quality battery! | कार्बन ऑरा नोट प्ले : मोठा डिस्प्ले, दर्जेदार बॅटरी !

कार्बन ऑरा नोट प्ले : मोठा डिस्प्ले, दर्जेदार बॅटरी !

Next

कार्बन कंपनीने आपला ऑरा नोट प्ले हा स्मार्टफोन ७,५९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला असून यात मोठा डिस्प्ले, दर्जेदार बॅटरी व फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे.

कार्बन आणि अन्य भारतीय कंपन्या एंट्री लेव्हल वा त्याच्या थोड्या वरील किंमत पट्टयाच्या विभागात जास्तीत जास्त स्मार्टफोन लाँच करत असल्याचे सर्वसाधारणपणे दिसून येते. कमीत कमी अथवा किफायतशीर मूल्यात चांगली फिचर्स देण्याकडे भारतीय कंपन्यांचे प्राधान्य असते. कार्बन ऑरा नोट प्ले हे मॉडेलदेखील याला अपवाद नाही. यातील १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले हा सहा इंच आकारमानाचा असेल. १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. 

कार्बन ऑरा नोट प्ले या मॉडेलमध्ये ३,३०० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची लिथीयम-आयन बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. आजच्या मल्टी-टास्कींगच्या युगात चांगली बॅटरी ही अत्यावश्यक बाब बनली आहे. या पार्श्‍वभूमिवर कार्बन ऑरा नोट प्ले या स्मार्टफोनमधील बॅटरी खूप वापर होऊनही एक दिवसापर्यंत टिकत असल्याचा कंपनीचा दावा आहे. कार्बन ऑरा नोट प्ले मॉडेलमध्ये ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये नाईट मोड प्रो सह जिओ-टॅगींग, पॅनोरामा शॉट, कंटिन्यूअस शॉट, स्माईल शॉट, फेस डिटेक्शन, ऑटो-फोकस आणि सेल्फ टायमर आदी सुविधा असतील. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कार्बन ऑरा नोट प्ले या स्मार्टफोनमध्ये फेस ब्युटी या सुविधेसह ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात विस्तोसो हे अ‍ॅप प्रि-इन्स्टॉल्ड या अवस्थेत देण्यात आले असून ते उत्तम फोटोग्राफीसाठी उपयुक्त ठरणारे आहे. याच्या मदतीने प्रतिमांना पेन आर्ट, स्केच आणि आर्टीस्टीक आदी इफेक्ट प्रदान करता येतात. तर वर नमूद केल्यानुसार या मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील असेल. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा आहे.

कार्बन ऑरा नोट प्ले हे मॉडेल ब्लॅक आणि शँपेन या रंगांच्या पर्यायामध्ये ग्राहकांना सादर करण्यात आले असून यात फोर-जी व्हिओ-एलटीई व एलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. अन्य फिचर्समध्ये वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, जीपीएस, एफएम रेडिओ, मायक्रो-युएसबी, अ‍ॅक्सलेरोमीटर, जी-सेन्सर, प्रॉक्झीमिटी आणि लाईट सेन्सर आदींचा समावेश असेल. 

Web Title: Play Carbon Aura Note: bigger display, quality battery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.