शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार 2000 रुपये? ‘या’ अ‍ॅपवर मिळेल संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:48 PM2022-03-16T12:48:21+5:302022-03-17T11:10:03+5:30

PM Kisan: केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेची माहिती एका मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून मिळवता येते.  

PM Kisan GOI Mobile App Download For PM Kisan Samman Nidhi Yojana 11th Instalment  | शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार 2000 रुपये? ‘या’ अ‍ॅपवर मिळेल संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार 2000 रुपये? ‘या’ अ‍ॅपवर मिळेल संपूर्ण माहिती

Next

PM Kisan: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) केंद्र सरकारकडून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार लवकरच 11 व्या हप्त्यासाठी पैसे पाठवणार आहे. परंतु खात्यात किती पैसे आले आणि हे पैसे कधी ट्रान्सफर करण्यात आले? याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळत नाही.  

यावर उपाय म्हणून सरकारनं पीएम किसान जीओआय मोबाईल अ‍ॅप (PM Kisan GoI Mobile App) सादर केलं आहे. त्यामुळे शेतकरी काही क्लिक्स मध्ये अ‍ॅपमधून त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये येणाऱ्या रकमेची माहिती मिळवू शकतात.  

PM Kisan GoI Mobile App: 

गुगल प्ले स्टोरवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे. इथे नोंदणी केल्यावर तुम्ही हिंदी आणि इंग्लिशसह 8 भारतीय भाषांमध्ये माहिती मिळवू शकता. या अ‍ॅपमधून शेतकरी आधार कार्ड, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबरच्या मदतीनं किसान सम्मान निधी योजनेची माहिती मिळवू शकतात. यात बँक अकाऊंटमध्ये कधी आणि किती पैसे आले,   देखील समजेल.  

अ‍ॅपमधून माहिती मिळवण्यासाठी  

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवरून तुमच्या स्मार्टफोन पीएम किसान जीओआय मोबाईल अ‍ॅप (PMKISAN GoI Mobile App) डाउनलोड करा. 
  • त्यानंतर अ‍ॅप ओपन करून New Farmer Registration वर क्लिक करा. 
  • इथे तुमचा आधार नंबर टाका.  
  • त्यानंतर नाव, पत्ता बँक अकाऊंटची आणि इतर आवश्यक माहिती सबमिट करा.  
  • तुमचं पीएम किसान मोबाईल अ‍ॅपवरील रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. 

Web Title: PM Kisan GOI Mobile App Download For PM Kisan Samman Nidhi Yojana 11th Instalment 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.