खुशखबर! ‘या’ तारखेपर्यंत भारतात 5G सेवा होऊ शकते सुरु; पंतप्रधान कार्यालयानं व्यक्त केली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 05:24 PM2022-02-26T17:24:43+5:302022-02-26T17:25:57+5:30
5G In India: पंतप्रधान कार्यालयानं देशात 15 ऑगस्टपर्यंत 5G सेवेची सुरुवात व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) नं टेलिकॉम रेग्युलेटर (TRAI) कडे 5G स्पेक्ट्रमच्या किंमतीच्या शिफारशींचा वेग वाढवण्यास सांगितलं आहे. पंतप्रधान कार्यालयानं देशात 15 ऑगस्टपर्यंत 5G सेवेची सुरुवात व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशननं टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडियाला 22 फेब्रुवारी रोजी एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात पंतप्रधान कार्यालयानं 15 ऑगस्ट 2022 पर्यंत 5G सेवेचा इनिशियल लाँच होण्याच्या दृष्टीनं काम करावं असा आग्रह डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनकडे केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे ट्रायकडून आवश्यक असलेल्या शिफारशी मार्च 2022 च्या आधी मिळाव्या, असं DoT नं म्हटलं आहे.
TRAI कडून मागवल्या शिफारसी
डिपार्टमेंटनं स्पेक्ट्रमची किंमत, त्याचं वाटप करण्याची पद्धत, स्पेक्ट्रम ब्लॉकचा आकार, पेमेंटची पद्धत या संबंधित ट्राय कडून शिफारसी मागवल्या आहेत. या पत्रातून डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशननं 800Mhz, 900Mhz आणि 1800Mhz बँड्समध्ये अतिरिक्त स्पेक्ट्रम उपलब्ध असल्याचं देखील सांगितलं आहे. 900Mhz बँडमध्ये संपूर्ण देशात अतिरिक्त 34Mhz स्पेक्ट्रम उपलब्ध आहे. तसेच हरियाणामध्ये 1800 Mhz बँड अंतर्गत 10 Mhz स्पेक्ट्रम उपलब्ध झालं आहे.
हे देखील वाचा:
- 8GB RAM सह दणकट लॅपटॉपची एंट्री; जाणून घ्या Nokia PureBook Pro ची किंमत आणि फीचर्स
- चिनी कंपन्यांना धक्का! स्वदेशी कंपनी करतेय स्वस्त आणि दमदार Smartphone ची तयारी
- लैभारी! 9 हजार रुपयांमध्ये मिळवा Samsung चा दमदार Smart TV; Amazon वर धमाकेदार सेल सुरु