Poco नं सादर केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन; स्वस्तात 6000mAh बॅटरी आणि 3 कॅमेरा
By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2022 10:35 AM2022-06-07T10:35:46+5:302022-06-07T10:35:54+5:30
Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी, 13MP कॅमेरा आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
Poco आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली होती. जागतिक बाजारात Poco C40 स्मार्टफोनला 16 जूनला लाँच होणार आहे. त्याआधीच आता हा स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये लाँच झाला आहे. यात 13MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, 6000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. या लाँचमुळे फक्त स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही तर संभाव्य किंमत देखील समजली आहे.
Poco C40 चे स्पेसिफिकेशन्स
Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे, जो HD+ 1560 x 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह येणाऱ्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60Hz आणि ब्राईटनेस 400 निट्स आहे. कंपनीनं डिस्प्लेला Corning Gorilla Glass ची सुरक्षा दिली आहे. Poco C40 स्मार्टफोन व्हिएतनाम मध्ये JLQ JR10 चिपसेटसह आला आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI वर चालतो.
Poco C40 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टव्हिटीसाठी या ड्युअल सिम 4G हँडसेटमध्ये ड्युअल बँड WiFi, Bluetooth 5.0, GNSS, USB Type-C पोर्ट, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळतो. सुरक्षेसाठी रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh च्या बॅटरीसह 18W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.
Poco C40 ची किंमत
Poco C40 स्मार्टफोनचा व्हिएतनाममध्ये 4GB रॅम व 64GB स्टोरेज मॉडेल 3,490,000 VND (सुमारे 11,700 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. फोन ब्लॅक, यल्लो आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. भारतात हा डिवाइस यापेक्षा कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो.