6000mAh बॅटरीसह येतोय Poco चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच संपूर्ण माहिती लीक  

By सिद्धेश जाधव | Published: June 6, 2022 09:00 AM2022-06-06T09:00:29+5:302022-06-06T09:00:42+5:30

Poco C40 लवकरच जागतिक बाजारात लाँच होणार असून 6000mAh बॅटरीसह येणारा हा कंपनीचा पहिला हँडसेट असेल.

Poco C40 Will Launch Globally On 16 June Know Price And Specifications  | 6000mAh बॅटरीसह येतोय Poco चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच संपूर्ण माहिती लीक  

6000mAh बॅटरीसह येतोय Poco चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच संपूर्ण माहिती लीक  

googlenewsNext

Poco आपल्या सी सीरिजमध्ये बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करते. आता कंपनीनं नव्या एंट्री लेव्हल स्मार्टफोनची घोषणा केली आहे. लवकरच Poco C40 बाजारात येईल. पोको ग्लोबलच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार येत्या 16 जूनला एका लाँच इव्हेंटच्या माध्यमातून कंपनीचा हा स्वस्त स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला येईल.  

Poco C40 ची डिजाईन आणि स्पेक्स  

Poco C40 स्मार्टफोन कंपनीच्या सिग्नेचर येलो कलरमध्ये सादर करण्यात येईल, अशी माहिती घोषणा करताना दिली आहे. फोनमध्ये 6000mAh मोठी बॅटरी मिळू शकते, एवढ्या मोठ्या बॅटरीसह फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळू शकतो. 6000mAh च्या एवढ्या मोठ्या बॅटरीसह येणार हा कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन असेल, असं देखील कंपनीनं सांगितलं आहे.  

या फोनमध्ये 6.71 इंचाचा टियरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात येईल, जो पोको फोनमध्ये मिळणार आतापर्यंतच्या सर्वात मोठा डिस्प्ले आहे. कंपनीन ट्विटरवर दाखवलेल्या टीजरवरून Poco C40 स्मार्टफोनच्या रियर पॅनलची माहिती मिळाली आहे. फोनच्या मागच्या बाजूला फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात येईल. तसेच एक चौकोनी कॅमेरा मॉड्यूल देखील दिसत आहे. वरच्या बाजूला पोकोची ब्रॅंडिंग देखील दिसत आहे. आता या फोनची किंमत किती ठेवली जात आहे, हे पाहावं लागेल.  

Redmi 10C चा रीब्रँड 

पोकोच्या आगामी स्मार्टफोनच्या टीजर पोस्टरवरून असा अंदाज लावला जात आहे की, हा फोन शाओमीच्या Redmi 10C चा रीब्रँड व्हर्जन असू शकतो. रेडमी 10सी स्मार्टफोन आधीच जागतिक बाजारात आला आहे. तसेच भारतात देखील शाओमीनं Redmi 10 स्मार्टफोन सादर केला आहे. पोको हा हँडसेट नव्या डिजाईन आणि कलर ऑप्शनसह बाजारात घेऊन येईल, अशी अपेक्षा आहे.  

Web Title: Poco C40 Will Launch Globally On 16 June Know Price And Specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.