6000mAh च्या राक्षसी बॅटरीसह POCO C40 ची एंट्री; कमी किंमतीत फीचर्सचा पाऊस
By सिद्धेश जाधव | Published: June 17, 2022 11:35 AM2022-06-17T11:35:59+5:302022-06-17T11:36:06+5:30
POCO C40 स्मार्टफोन 6000mAh ची बॅटरी आणि नवीन JLQ JR510 ऑक्टाकोर प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.
POCO लवकरच भारतात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Poco F4 5G सादर करणार आहे. परंतु त्याआधी जागतिक बाजारात POCO C40 स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. याआधी व्हिएतनाममध्ये हा हँडसेट 6,000mAh ची बॅटरी आणि नवीन JLQ JR510 प्रोसेसरसह सादर करण्यात आला होता. जागतिक बाजारात देखील हेच फीचर्स देण्यात आले आहेत.
POCO C40 चे स्पेसिफिकेशन्स
Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे, जो HD+ 1560 x 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह येणाऱ्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60Hz आणि ब्राईटनेस 400 निट्स आहे. कंपनीनं डिस्प्लेला Corning Gorilla Glass ची सुरक्षा दिली आहे. सुरक्षेसाठी रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो.
Poco C40 स्मार्टफोन JLQ JR10 चिपसेटसह आला आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 13 वर चालतो. सोबत 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh च्या बॅटरीसह 18W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.
Poco C40 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टव्हिटीसाठी या ड्युअल सिम 4G हँडसेटमध्ये ड्युअल बँड WiFi, Bluetooth 5.0, GNSS, USB Type-C पोर्ट, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळतो.
POCO C40 ची किंमत
वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये या डिवाइसची किंमत वेगवेगळी असेल. त्यामुळे भारतीय बाजारातील किंमतीची माहिती देखील समोर आली आहे. POCO C40 स्मार्टफोन Power Black, Coral Green आणि POCO Yellow कलरमध्ये विकत घेता येईल.