Poco C50 Launched in India: नव्या वर्षांत स्वस्त स्मार्टफोन आला; 6499 रुपये किंमत... वाटेल 50 हजारांचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 04:48 PM2023-01-03T16:48:41+5:302023-01-03T16:48:57+5:30

कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे. कंपनीने यामध्ये ऑक्टा कोअर MediaTek Helio A22 चिपसेट वापरला आहे.

Poco C50 Launched in India: A cheap smartphone came in the new year; Price 6499 rupees... 50 thousand... | Poco C50 Launched in India: नव्या वर्षांत स्वस्त स्मार्टफोन आला; 6499 रुपये किंमत... वाटेल 50 हजारांचा...

Poco C50 Launched in India: नव्या वर्षांत स्वस्त स्मार्टफोन आला; 6499 रुपये किंमत... वाटेल 50 हजारांचा...

Next

पोकोने भारतात स्वस्तातला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे. पोकोने हा फोन सी सिरीजमध्ये आणला आहे. याचे नाव Poco C50 ठेवण्यात आले आहे. कंपनीने यामध्ये ऑक्टा कोअर MediaTek Helio A22 चिपसेट वापरला आहे. तसेच 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. 

Poco C50 दोन रॅम मॉडेलमध्ये आणण्यात आला आहे. हा फोन 2GB आणि 3GB रॅम मध्ये मिळत आहे. यामध्ये 32GB ची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. याची बेस व्हेरिअंटची किंमत 6499 रुपये ठेवण्यात आली आहे. याचा टॉप व्हेरिअंट 7299 रुपयांना आहे. 

Poco C50 कंट्री ग्रीन आणि रॉयल ब्लू कलर वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल. विक्री भारतात 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कंपनी त्यावर 1 वर्षाची वॉरंटी आणि इन-बॉक्स अॅक्सेसरीजवर 6 महिन्यांची वॉरंटी देत ​​आहे.

Poco C50 मध्ये 6.52-इंच वॉटर-ड्रॉप नॉच पॅनेल आहे. यामध्ये HD+ रिझोल्यूशन देण्यात आले आहे. या फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेटची स्क्रीन देण्यात आली आहे. त्याचा टच सॅम्पलिंग रेट 120Hz आहे. याच्या मागील बाजूस लेदरसारखे टेक्सचर डिझाइन देण्यात आले आहे.

मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून मेन कॅमेरा AI 8MP आहे. सोबत आणखी एक सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. हा हँडसेट Android 12 Go एडिशनवर काम करतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने त्याची मेमरी 512GB पर्यंत वाढवता येते. 10 वॉट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. पाठीमागे फिंगरप्रिंट सेन्सर आहे. 
 

Web Title: Poco C50 Launched in India: A cheap smartphone came in the new year; Price 6499 rupees... 50 thousand...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.