Poco C55: मस्तच! 50MP कॅमेरावाला स्वस्त फोन लॉन्च, कींमत १० हजारांपेक्षा कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 04:41 PM2023-02-21T16:41:17+5:302023-02-21T16:42:30+5:30
स्मार्टफोन निर्माती कंपनी 'पोको'नं भारतीय बाजारात Poco C55 स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
स्मार्टफोन निर्माती कंपनी 'पोको'नं भारतीय बाजारात Poco C55 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. पोको सी सीरिजमध्ये दाखल झालेल्या या फोनमध्ये मीडिया टेक हीलिओ प्रोसेसरसह बॅक पॅनलवर ड्युअर रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Poco C55 Price in India
पोकोच्या या स्मार्टफोनच्या 4GB रॅम/64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ९ हजार ४९९ रुपये इतकी आहे. तर 6GB रॅम/128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत १० हजार ९९९ रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे. यात पावर ब्लॅक, कूल ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन या रंगांचा समावेश आहे. स्मार्टफोन २८ फेब्रुवारीपासून कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसंच ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.
लॉन्च ऑफर्स
सेलच्या पहिल्या दिवशी, या हँडसेटचे बेस मॉडेल ८,४९९ रुपयांना विकले जाणार आहे आणि पहिल्या सेलमध्ये टॉप व्हेरिएंट ९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. HDFC, ICICI आणि SBI बँक कार्डद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे.
Poco C55 Specifications
डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर- फोनमध्ये 60 Hz रिफ्रेश रेटसह 6.71-इंच HD Plus LCD स्क्रीन आहे, जी 534 nits पीक ब्राइटनेस आणि 120 Hz टच सॅम्पलिंग दर देते.
चिपसेट, रॅम आणि स्टोरेज-
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी पोको सी55 मध्ये मीडिया टेक हीलियो जी85 प्रोसेसरसह 6GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिलं गेलं आहे. स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं १ टीबीपर्यंत वाढता येऊ शकतं.
कॅमेरा-
50-मेगापिक्संल प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह फोनच्या मागील पॅनलवर २-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल. फोनच्या पुढील बाजूस ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटी-
फोनमध्ये जीपीएस, वाय-फाय, 4G, मायक्रो-यूएसबी पोर्ट आणि ब्लूटूथ आवृत्ती 5.1 सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सुरक्षिततेसाठी, फिंगरप्रिंट सेन्सर या हँडसेटच्या मागील बाजूस स्थित आहे.
बॅटरी-
फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी १० वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.