Poco F3 GT फोन FCC वर लिस्ट; लवकरच सादर होईल हा गेमिंग सेंट्रिक फोन
By सिद्धेश जाधव | Published: June 19, 2021 03:18 PM2021-06-19T15:18:55+5:302021-06-19T15:20:52+5:30
Poco F3 GT FCC listing: Poco F3 GT स्मार्टफोन Redmi K40 Gaming Edition चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो
Poco F3 GT स्मार्टफोन FCC लिस्टिंगवर लिस्ट झाला आहे, हा फोन इथे 21061110AG मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. हा स्मार्टफोन Poco ब्रॅंडिंगसह लिस्ट करण्यात आला आहे हे विशेष. गेल्या महिन्यात पोको इंडियाने या फोनचा एक टीजर जारी केला होता आणि सांगितले होते कि हा फोन तिसऱ्या तिमाहीत लाँच करण्यात येईल.
FCC लिस्टिंगमध्ये Poco F3 GT काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. या फोनमध्ये Wi-Fi 6 सपोर्टसह MIUI 12 देण्यात येईल. फोनमध्ये ब्लूटूथ आणि एनएफसी सपोर्ट देखील मिळेल. या लिस्टिंगची माहिती प्रसिद्ध टिप्सटर अभिषेक यादवने दिली आहे.
Poco X3 GT recieves FCC certification.#Poco#PocoX3GThttps://t.co/HKL59n9Pj8https://t.co/MxElDFJjdlpic.twitter.com/AKTbcK9U3a
— Abhishek Yadav (@yabhishekhd) June 18, 2021
Redmi K40 Gaming Edition चे स्पेसिफिकेशन्स
Redmi K40 Gaming Edition स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन full-HD+ (2,400 x 1,800 पिक्सल) आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्राइमरी कॅमेरा 64MPचा आहे, त्याचबरोबर 8MPचा कॅमेरा आणि दोन कॅमेरा सेंसर 2MP चे देण्यात आले आहेत. 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा सेंसर आणि 2MP चे सेंसर मॅक्रो आणि डेप्थ सेंसर असू शकतात.
Redmi K40 Gaming Edition स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 SoC सह सादर केला गेला आहे. हा फोन 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो. यात 5,065mAh ची बॅटरी, 2 SIM कार्ड स्लॉट, 5G कनेक्टिविटी, NFC, IR blaster, आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.