पोकोची लोकप्रिय ‘F’ सीरिज लवकरच येणार भारतात; POCO F3 GT लाँचच्या उंबरठ्यावर
By सिद्धेश जाधव | Published: July 8, 2021 07:07 PM2021-07-08T19:07:09+5:302021-07-08T19:07:44+5:30
Poco F3 GT India Launch: पोकोने शेयर केलेल्या व्हिडीओमधून आगामी Poco F3 GT स्मार्टफोनची झलक मिळाली आहे. या फोनच्या उजवीकडे गेमिंग ट्रिगर असल्यामुळे हा फोन गेमिंग सेंट्रिक स्मार्टफोन असेल, हे समजले आहे.
POCO ने भारतात POCO F3 GT स्मार्टफोनच्या लाँचची तयारी सुरु केली आहे. या स्मार्टफोनच्या अनेक लाँच डेट्स आतापर्यंत समोर आल्या आहेत. परंतु आता अशी माहिती मिळाली आहे कि, POCO F3 GT भारतात या महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. हे माहिती लीक किंवा रुमर्समधून आलेली नाही तर POCO ने स्वतःहून Poco F3 GT स्मार्टफोनचा भारतीय लाँच टीज केला आहे. कंपनीने आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक छोटा व्हिडीओ शेयर करून POCO F3 GT टीज केला आहे. आता कंपनी लवकरच भारतात हा स्मार्टफोन लाँच करू शकते, अशी चर्चा आहे.
पोकोने शेयर केलेल्या व्हिडीओमधून आगामी Poco F3 GT स्मार्टफोनची झलक मिळाली आहे. या फोनच्या उजवीकडे गेमिंग ट्रिगर असल्यामुळे हा फोन गेमिंग सेंट्रिक स्मार्टफोन असेल, हे समजले आहे. तसेच या व्हिडीओमधून साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि बॅक पॅनलवरील पॅटर्नची झलक देखील दिसली आहे. हा फोन Redmi K40 Game Enhanced Edition का रिब्रँड व्हर्जन असू शकतो.
FFFor real??? pic.twitter.com/FKUUnuFfSg
— POCO India - The God Of Madness (@IndiaPOCO) July 8, 2021
POCO F3 GT चे स्पेसिफिकेशन्स
ग्लोबल मार्केटमध्ये POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाच्या फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC देण्यात आली आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या पोको स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित MIUI 12 देण्यात आला आहे.
POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा मुख्य कॅमेरा 64MP चा सेन्सर आहे, त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा सेंसर आणि 2MP चे सेंसर मॅक्रो आणि डेप्थ सेंसर असू शकतात. POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 5,065mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. पोकोच्या या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स Redmi K40 Gaming Edition सारखे आहेत.
POCO F3 GT ची भारतातील किंमत
Redmi K40 Gaming Edition च्या किंमतीवरून POCO F3 GT च्या भारतीय किंमतीचा कयास लावता येईल. हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. या फोनचा बेस व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 1,999 RMB (सुमारे 23,000 रुपये) मध्ये लाँच केला जाऊ शकतो. तसेच 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 2,199 RMB (सुमारे 25,300 रुपये) आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 2,699 RMB (सुमारे 31,000 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो.