सरप्राइज! उद्या लाँच होणार Poco चे दोन फोन; कंपनीने केली F सीरिजच्या फोनची घोषणा 

By सिद्धेश जाधव | Published: November 8, 2021 03:12 PM2021-11-08T15:12:17+5:302021-11-08T15:12:29+5:30

Poco M3 5G Phone And Poco F3 Luanch: POCO F3 चा नवीन व्हेरिएंट आणि POCO M4 Pro 5G Phone 9 नोव्हेंबरला होणाऱ्या इव्हेंटमधून सादर करण्यात येईल.

Poco f3 new variant launch with poco m4 pro 5g on november 9 know price specification  | सरप्राइज! उद्या लाँच होणार Poco चे दोन फोन; कंपनीने केली F सीरिजच्या फोनची घोषणा 

सरप्राइज! उद्या लाँच होणार Poco चे दोन फोन; कंपनीने केली F सीरिजच्या फोनची घोषणा 

Next

POCO उद्या म्हणजे 9 नोव्हेंबरला होणाऱ्या इव्हेंटमधून POCO M4 Pro 5G Phone सादर करणार आहे, अशी माहिती याआधीच आली होती. परंतु या लाँच इव्हेंटच्या एकदिवस आधीच कंपनीने आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. कंपनीने POCO F3 च्या नव्या व्हेरिएंटचा टीजर शेयर केला आहे. हा फोन देखील उद्या होणाऱ्या जागतिक लाँच इव्हेंटमधून ग्राहकांच्या भेटीला येईल. POCO F3 चा नवीन व्हेरिएंट स्नॅपड्रॅगन 888 सह सादर केला जाईल, अशी चर्चा आहे.  

Poco F3 

Poco F3 हा फोन याआधी लाँच झाला आहे. या फोनमध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनला ऑक्टा कोर क्वॉलकॉम Snapdragon 870 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

Poco F3 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP मुख्य सेन्सर, 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्सआणि 5MP चा मॅक्रो सेन्सर आहे. हा फोन 20MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, NFC, Infrared (IR), आणि USB Type-C पोर्ट मिळतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन 33W फास्ट चार्जिंग असेलल्या 4520mAh बॅटरीला सपोर्ट करतो.   

POCO M4 Pro 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स    

POCO M4 Pro 5G स्मार्टफोन Redmi Note 11 5G रिब्रँड असल्यास या फोन्सचे स्पेसिफिकेशन्स देखील सारखे असतील. त्यामुळे आगामी पोको फोन 6.6-इंचाच्या फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह बाजारात येईल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेशला सपोर्ट करेल. या फोनला 6nm प्रोसेसवर वाढती Dimensity 810 चिपसेटची ताकद देण्यात येईल. त्याचा 8GB RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.    

POCO M4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा सेन्सर मिळेल. या पोको फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल. 

Web Title: Poco f3 new variant launch with poco m4 pro 5g on november 9 know price specification 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.