12GB RAM सह POCO चा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; वनप्लसला बाजारातून हद्दपार करण्याची तयारी?
By सिद्धेश जाधव | Published: June 13, 2022 10:13 AM2022-06-13T10:13:28+5:302022-06-13T10:13:46+5:30
एका पोस्टरनुसार पोको एफ4 5जीमध्ये 12GB LPDDR5 RAM देण्यात येईल. तसेच दुसऱ्या ट्विटमधून 256जीबी मेमरीची माहिती समोर आली आहे.
Poco F4 5G स्मार्टफोन भारतात येत असल्याची माहिती स्वतः कंपनीनं दिली आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन फ्लॅगशिप लेव्हल प्रोसेसरसह लाँच होणार असल्यामुळे हा नवा फ्लॅगशिप किलर असल्याची चर्चा आहे. आता पोकोनं स्वतःहून स्मार्टफोनमधील रॅम आणि स्टोरेजची माहिती दिली आहे. हा फोन चीनमध्ये आलेल्या Redmi K40s स्मार्टफोनचा रीब्रँड व्हर्जन म्हणून भारतात येऊ शकतो.
कंपनीनं आपल्या अधिकरटु ट्विटर अकाऊंटवरून एक नवीन पोस्टर शेयर केलं आहे. य पोस्टरमध्ये आगामी स्मार्टफोनच्या रॅम आणि स्टोरेजची माहिती देण्यात आली आहे. एका पोस्टरनुसार पोको एफ4 5जीमध्ये 12GB LPDDR5 RAM देण्यात येईल. तसेच दुसऱ्या ट्विटमधून 256जीबी मेमरीची माहिती समोर आली आहे. एका ट्विटनुसार हा फोन भारतासह जागतिक बाजारात देखील लाँच केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
POCO F4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
POCO F4 स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा आगामी पोकोफोन Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. POCO F4 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित MIUI 13 वर चालेल.
या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल, सोबत 13MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 5MP ची टेलीफोटो लेन्स मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 32MP चा कॅमेरा देण्यात येईल. आगामी पोको स्मार्टफोन 4,5000mAh च्या बॅटरीसह येईल जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.