लै भारी! POCO F4 GT च्या लाँचची तारीख ठरली; स्वस्तात 12GB RAM आणि सर्वात ताकदवान चिपसेट
By सिद्धेश जाधव | Published: April 15, 2022 12:03 PM2022-04-15T12:03:24+5:302022-04-15T12:03:44+5:30
Poco F4 GT स्मार्टफोन जागतिक बाजारात 12GB रॅम, स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट, 120W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह लाँच केला जाईल.
POCO नं गेल्यावर्षी आपला स्वस्त गेमिंग स्मार्टफोन Poco F3 GT सादर केला होता. आता या फोनच्या अपग्रेड व्हर्जनची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. कंपनी येत्या 26 एप्रिलला POCO F4 GT नावाचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. चीनमध्ये याआधी आलेला हा फोन जागतिक बाजारात लाँच केला जाईल. त्यानंतर भारतासह इतर बाजारपेठांमध्ये याची एंट्री होईल.
पोकोनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपल्या आगामी गेमिंग स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. हा डिवाइस 26 एप्रिलला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी लाँच केला जाईल. POCO F4 GT लाँच इव्हेंट कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
Poco F4 GT चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश आणि 480Hz टच सॅंप्लिंग रेटला सपोर्ट करतात. हा फोन डिस्प्लेमेट A+ रेटिंगसह येतो आणि सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी यातील 4700mAh ची बॅटरी वेगवान 120 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह मागे ट्रिपल सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. 12 जीबी पर्यंतचा वेगवान LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंतची लेटेस्ट UFS 3.1 स्टोरेज मिळते. हा फोन क्वॉलकॉमच्या नव्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये ड्यूल VC कूलिंग देण्यात आली आहे.