फक्त 10,499 रुपयांमध्ये पोकोचा दमदार स्मार्टफोन लाँच; 6000mAh बॅटरीसह आला नवीन फोन

By सिद्धेश जाधव | Published: July 17, 2021 02:55 PM2021-07-17T14:55:43+5:302021-07-17T14:57:35+5:30

Poco M3 चा नवीन व्हेरिएंट कंपनीने भारतात सादर केला आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये कंपनीने 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिली आहे.  

POCO M3 4GB RAM 64GB Storage variant launched at price rs 10499 in india  | फक्त 10,499 रुपयांमध्ये पोकोचा दमदार स्मार्टफोन लाँच; 6000mAh बॅटरीसह आला नवीन फोन

पोको एम3 च्या नवीन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे.

Next

POCO पुढल्या आठवड्यात भारतात आपला गेमिंग स्मार्टफोन POCO F3 GT लाँच करणार आहे. कंपनीने याची अधिकृत घोषणा देखील केली आहे. परंतु तत्पूर्वी कंपनीने भारतात एक बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. Poco M3 स्मार्टफोनचे 6GB रॅमसह 64GB आणि 128GB असे दोन स्टोरेज व्हेरिएंट्स भारतात उपलब्ध आहेत. आता या फोनचा 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. या नवीन व्हेरिएंटची किंमत फक्त 10,499 रुपये ठेवण्यात आली आहे.  

POCO M3 चे व्हेरिएंट्स व किंमत  

पोको एम3 च्या नवीन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे. तसेच या फोनच्या 6GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची नवीन किंमत 11,499 रुपये आहे. तसेच फोनचा 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट आता 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. पोको एम3 नवीन व्हेरिएंट्स व किंमतीसह शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. 

Poco M3 चे स्पेसिफिकेशन्स  

POCO M3 मध्ये 6.53 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पोको फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरवर चालतो. POCO M3 स्मार्टफोन Android 10 ओएसवर आधारित मीयुआय 12 सह येतो. POCO M3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48MP मुख्य कॅमेरा, 2 MP चा डेप्थ आणि 2 MP चा मॅक्रो सेन्सर आहे. हा फोन 8MP फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी POCO M3 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

Web Title: POCO M3 4GB RAM 64GB Storage variant launched at price rs 10499 in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.