तयार व्हा! आणखी एक स्वस्त 5G फोन येतोय भारतात; कंपनीनं सांगितली लाँचची तारीख
By सिद्धेश जाधव | Published: April 26, 2022 07:47 PM2022-04-26T19:47:34+5:302022-04-26T19:47:44+5:30
येत्या 29 एप्रिलला Poco M4 5G स्मार्टफोन भारतीयांच्या सेवेत दाखल होईल.
Poco M4 5G स्मार्टफोन भारतात येणार असल्याची माहिती स्वतः कंपनीनं दिली आहे. शाओमीच्या सब-ब्रँड पोको इंडियानं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी डिवाइसची घोषणा केली आहे. येत्या 29 एप्रिलला Poco M4 5G स्मार्टफोन भारतीयांच्या सेवेत दाखल होईल. सध्या कंपनीच्या एम सीरिजमध्ये M4 Pro, M4 Pro 5G आणि M3 5G असे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Poco M4 5G स्मार्टफोन भारतात 12,000 रुपयांच्या आसपास सादर केला जाऊ शकतो. कंपनीनं शेयर केलेल्या पोस्टरनुसार, हा एक ड्युअल रियर कॅमेरा असलेला हँडसेट असेल. तसेच या फोनचे पिवळा आणि निळा असे दोन कलर व्हेरिएंट बाजारात येतील.
Poco M4 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स
आगामी Poco M4 5G स्मार्टफोन 6.58-इंचाच्या फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह बाजारात येईल. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मागे असेलेल्या ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 50MP मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल.
या अँड्रॉइड 12 स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत रॅमसह 128GB पर्यंतची स्टोरेज मिळेल. इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाईल. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते. बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह कंपनीनं यात साईड फिंगरप्रिंट सेन्सर देऊ शकते. तसेच किंमत कमी करण्यासाठी प्लास्टिक बॉडीचा वापर केला जाऊ शकतो.