8GB RAM सह येणार POCO M4 Pro 5G Phone; पुढील महिन्यात होऊ शकतो भारतात लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 01:05 PM2021-10-28T13:05:33+5:302021-10-28T13:05:40+5:30

Upcoming 5G Phone In India Poco M4 Pro: POCO M4 Pro 5G Phone चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर Xiaomi 21091116AC मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला. हा चिनी मॉडेल आहे हे मॉडेल नंबरवरून समजले आहे.

POCO M4 Pro 5G Phone geekbench specs India Launch Price leak  | 8GB RAM सह येणार POCO M4 Pro 5G Phone; पुढील महिन्यात होऊ शकतो भारतात लाँच 

8GB RAM सह येणार POCO M4 Pro 5G Phone; पुढील महिन्यात होऊ शकतो भारतात लाँच 

googlenewsNext

शाओमीच्या सब-ब्रँड POCO अंतर्गत नवीन 5G Phone येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. हा फोन कंपनीच्या ‘एम सीरीज’ अंतगर्त POCO M4 Pro 5G नावाने सादर केला जाणार आहे. आता हा फोन एका बेंचमार्किंग साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. जिथे या फोनच्या स्पेक्सची माहिती मिळाली आहे. तसेच हा फोन पुढील महिन्यात भारतात लाँच होईल, असे देखील समजले आहे.  

POCO M4 Pro 5G Phone चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर Xiaomi 21091116AC मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला. हा चिनी मॉडेल आहे हे मॉडेल नंबरवरून समजले आहे. या लिस्टिंगमुळे या फोनचा जागतिक लाँच नजीक असल्याचा खुलासा झाला आहे आणि त्यानंतर हा फोन भारतात दाखल होऊ शकतो.  

POCO M4 Pro 5G Phone चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

गिकबेंचनुसार POCO M4 Pro 5G स्मार्टफोन मीडियाटेक डिमेंसीटी 700 चिपसेटसह बाजारात येईल. फोनमध्ये 2.40गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टकोर प्रोसेसर मिळेल. तसेच या फोनमध्ये 8GB RAM मिळू शकतो. हा फोन अँड्रॉइड 11 ओएस वर चालेल, असे सर्टिफिकेशनमध्ये समोर आले आहे. या फोनला सिंगल-कोर टेस्टमध्ये 603 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 1779 स्कोर मिळाला आहे.  

लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार या फोनमध्ये मीयुआय 12.5 व्हर्जन मिळू शकते. तसेच फोटोग्राफीसाठी 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी POCO M4 Pro 5G Phone मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात येईल.  

Web Title: POCO M4 Pro 5G Phone geekbench specs India Launch Price leak 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.